पाच हजाराचे विजबिल १८ हजारांवर : विजबिल पाहून रेणूका शहाणेंना धक्का

    29-Jun-2020
Total Views |
Renuka_1  H x W 
 
 
 
 
 


मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री रेणूका शहाणे यांना शनिवारी आलेल्या विजबिलातील रक्कम वाचून मोठा धक्का बसला. विजेचे बिल ५,५१० रुपयांवरून थेट १८,०८० रुपये इतके आल्याचे ट्विट करत त्यांनी अदानी इलेक्ट्रीसिटीकडे जाब विचारला आहे. बिलाच्या रक्कमेत एवढी मोठी तफावत कशी होऊ शकते, असेही त्यांनी विचारले. सध्या महावितरण, रिलायन्स आणि अदानी सर्वच विजबिलात भरमसाठ विजबिल दरवाढ दिसून येत आहे. 
 
 
 
 
सर्व सामान्यांना आठशे-नऊशे रुपयांवरून थेट दोन ते तीन हजारांपर्यंत विजबिलाची रक्कम आकारण्यात आली आहे. याबद्दल अनेकांनी तक्रारकरूनही त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले जात नसल्याची तक्रार केली जात आहे. आता सेलिब्रिटींनाही याचा फटका बसू लागल्यानंतर तरी सरकारला जाग येणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. शहाणे यांना मे महिन्याच्या बिलाची रक्कम पाच हजारांवरून थेट १८ हजार ८० आकारण्यात आली आहे. तसेच जूनची रक्कम बेरीज करून एकूण विजबिलाचे देयक हे २९ हजार ७०० रुपये इतके आकारण्यात येत आहे. 



 
 
 
 
दरम्यान, अभिनेत्री तापसी पन्नूनेही विजबिलाबद्दल तक्रार केली आहे. गेल्या महिन्यात तिच्या विजबिलात भरमसाठ वाढ झाली. तिच्या विजबिलावरील देयक ३६ हजारांची रक्कम पाहून तिलाच धक्का बसला. 'मी कुठलेलही नवे उपकरण घेतले नाही किंवा अन्य कुठल्याही प्रकारची जादा विज वापरली नाही, तरीही इतकी रक्कम का आकारण्यात येत आहे, असा प्रश्न तिने ट्विटरद्वारे विचारला होता.