मोठा कोरोना छोटा कोरोना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2020   
Total Views |

uddhav thackeray sanjay r


मोदींची ‘मन की बात’ झाली की यांच्या साहेबांची लगेच कोमट पाण्याची बात सुरू होते. आता अदूरदृष्टीचे संजय म्हणाले, जवानांनी शौर्य दाखवले मग बाकीचे जवान काय सीमेवर तंबाखू मळत होते का? असे बोलून सैनिकांचा अपमान करण्याचा अधिकार यांना कुणी दिला?


गलवान खोर्‍यात बिहार रेजिमेंटने शौर्य गाजवले आणि त्या रेजिमेंटबद्दल दोन शब्द पंतप्रधान मोदी काय बोलले; तर यांनी लगेच सैनिकांच्या जाती-प्रांत शोधून त्यावर बोलणे सुरू केले. आता मोदी बोलले म्हणजे त्यावर प्रतिक्रिया दिली नाही तर मग आपण राष्ट्रीय ज्ञानी आहोत हे कसे कळणार, असे यांना वाटते. मोदींची ‘मन की बात’ झाली की यांच्या साहेबांची लगेच कोमट पाण्याची बात सुरू होते. आता अदूरदृष्टीचे संजय म्हणाले, जवानांनी शौर्य दाखवले मग बाकीचे जवान काय सीमेवर तंबाखू मळत होते का? असे बोलून सैनिकांचा अपमान करण्याचा अधिकार यांना कुणी दिला?


सैनिक देशासाठी प्राणाची आहुती द्यायला तयार असतात. त्यांच्या शौर्याची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. सामान्य जनता इतकेच म्हणते की, यांना जरा सीमेवर न्या, तेही तणावाच्या वेळेस मग यांना कळेल की सीमेवर सैनिक कोणत्या परिस्थितीमध्ये राहतात. तंबाखू मळतात की देशासाठी छातीवर गोळी झेलतात. इथे सुरक्षित वातावरण, अतिसुरक्षित सत्तेच्या कवचामध्ये बाष्कळ बडबड करायला यांचे काय जाते? इथे काय चुकीने तोंड लपवायची पाळी आली तर लिलावती हॉस्पिटल आहेच. काहीही बरळायचे, परिणाम आपल्यावर उलटतील असे दिसले की मग दिल्ली, बारामती, वांद्रे अगदी राजभवनावरही कुर्निसात करायचा. ही संस्कृती यांनीच तर स्वाभिमानी महाराष्ट्रात आणली. यांच्या जिभेलाही हाड नाही आणि पाठीलाही कणा नाही. जी कुठेही स्वार्थासाठी लाळ घोटते. माणूस इतका विघातक असू शकतो. आजपर्यंत सैनिकांमध्ये कुणीही जातीभेद केला नव्हता, प्रांतवाद केला नव्हता. पण यांनी वेगवेगळ्या रेजिमेंटचे नाव जातीय आणि प्रांतीय भेदातून घेण्याचा प्रयत्न केला. सध्या कोरोनाकाळ आहे. स्वर्गीय बाळासाहेबांनी अक्षरशः रक्त शिंपून शिवसेना निर्माण केली-वाढवली. त्या संघटनेने महाराष्ट्राला एकेकाळी खरेच हक्क मिळवून दिला. पण आता या संघटनेचे नाव घेऊन सत्तेला चिकटलेला हाही एक अविचारी कोरोनाच म्हणायला हवा. अरे व्वा, काय योगायोग, घड्याळाच्या काट्यावर चालणार्‍या यांच्या नव्या साहेबांचे नामकरणही असेच कुणीतरी केले आणि आता यांचेही त्यांच्यासारखे नामकरण. मोठे कोण छोटे कोण मी वादात पडत नाही, तुम्हीच ठरवा. कोरोना गो, गो, कोरोना...



‘कोरोना ऑडिट’ होईल का?


गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये कोरोनामुळे मृत पावलेल्या लोकांपेक्षा इतर आजारांनी मृत पावलेल्यांची संख्या जास्त आहे. तसेच कोरोनामुळे मनःस्थिती विचलित झालेल्यांची संख्याही मोठीच आहे. कोरोनामुळे लोकांमध्ये एकमेकांवरचा विश्वास संपत चालला आहे. थोडक्यात कोरोनाने जग बदलले. जग बदलले पण कष्टकर्‍यांचे कष्ट बदलले का? ‘लॉकडाऊन’ शिथील झाले, कामधंदे सुरू झाले. सम-विषम रचनेतून दुकानेही उघडली गेली. इथे काम करणार्‍या कामगारांना पुन्हा बोलावले गेले. मोठमोठ्या कंपन्या ज्यांचे शॉपिंग विंडो तितक्याच मोठमोठ्या शॉपिंग सेंटरमध्ये असतात त्यांचेही काम सुरू झाले. ठीक आहे. कधी ना कधी हे होणारच होते. पण ‘ये साल दुसरा था वो साल दुसरा है’ या उक्तीप्रमाणे कोरोनाच्या आधीचा काळ आणि कोरोनाच्या नंतरचा काळ वेगळा आहे. ज्यांना ‘वर्क फ्रॉर्म होम’ शक्य नाही, आणि कामाला गेल्याशिवाय गत्यंतर नाही, असे लोक पोटासाठी, कुटुंबाला जगवण्यासाठी कामाला गेले. त्यांनी आपापली काळजी घेतली.




पण ते ज्या ठिकाणी कामाला जातात तेथील वातावरण कसे आहे? कितीतरी कंपन्या, कितीतरी शॉपिंग सेंटर, दुकाने अशी आहेत की ज्यामध्ये वैयक्तिक शौचालय नाही. सार्वजनिक शौचालय आहे. वस्तीपातळीवरील शौचालयांचे दिवसांतून ठराविक वेळी सॅनिटायझेयशन केले जाते. तसे या कामाच्या ठिकाणच्या सार्वजनिक शौचालयांचे सॅनिटायझेशन केले जाते का? हॅण्डवॉश आणि तत्सम प्राथमिक सुविधा इथल्या कामगारांना उपलब्ध करून दिल्या जातात का? जीव मुठीत घेऊन कामाला येणार्‍याचे नुसते ‘थर्मल टेस्टिंग’ तरी होते का? येथील सफाई कामगार, येथील सुरक्षा कर्मचारी यांचे काय? काही माहिती नाही. मोठमोठ्या कंपन्यांनी आपली सेंटर्स ‘अनलॉक’ केली. तिथे त्या कंपनीचे उत्पादन विकणार्‍या मुली-महिला यांना एक दिवसाआड कामाला यायला सांगितले. सक्ती नाही. पण सल्ला दिला की, तुम्हाला यायचे नसेल तर राजीनामा द्या. ट्रेन सुरू नाहीत. पण यांना वेळेवर पोहोचलेच पाहिजे. कारण, बसेस सुरू आहेत. पण, बसेस हाय-वेवर सोडणार आणि या मुली-महिला, इतर कर्मचारी वर्ग मैलभर चालत जाणार. जगण्यासाठी कितीदा तरी मरणयातना भोगणारा हा कष्टकरी वर्ग. कुणी यांचे पालक बनेल का? त्यांच्या कामाच्या ठिकाणांचे ‘कोरोना ऑडिट’ होईल का?

@@AUTHORINFO_V1@@