यांच्या तर्‍हाच वेगळ्या...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2020   
Total Views |

china kiribati_1 &nb




सध्याच्या घडीला जागतिक प्रश्न म्हणून कोरोना आणि कोरोनामुळे निर्माण झालेल्या सर्वच स्तरातील समस्या हा यक्षविषय आहे. मात्र, पाकिस्तान, चीन आणि नेपाळ या तीन राष्ट्रांना त्याचे काही सोयरसुतक आहे, असे त्यांच्या एकंदरीत वागणुकीतून वाटत नाही. कोरोना महामारीच्या काळातून जग जात असताना भारताशी वाद घालण्याबरोबरच चीनने प्रशांत महासागरातील किरीबाती या छोट्याशा देशात आपले दूतावास सुरु केले आहे.



जीवनात विविध प्रसंग समोर येत असतात. अशा वेळी काही गंभीर प्रसंग उद्भवला तर व्यक्ती आणि व्यक्ती समूह त्या प्रश्नाकडेच लक्ष देत असतात. मात्र, त्यात कोणी काही भलतेच वागणे वा बोलणे सुरु केले तर आपण वेडे की तो शहाणा हा प्रश्न मनाला सतावतो. सध्या जगाच्या पाठीवर असेच चालू आहे. त्या तीन देशांना ‘थ्री इडियट’ म्हणावे की, जगाने स्वतःला कोसावे हाच सवाल उपस्थित होत आहे. सध्याच्या घडीला जागतिक प्रश्न म्हणून कोरोना आणि कोरोनामुळे निर्माण झालेल्या सर्वच स्तरातील समस्या हा यक्षविषय आहे. मात्र, पाकिस्तान, चीन आणि नेपाळ या तीन राष्ट्रांना त्याचे काही सोयरसुतक आहे, असे त्यांच्या एकंदरीत वागणुकीतून वाटत नाही. कोरोना महामारीच्या काळातून जग जात असताना भारताशी वाद घालण्याबरोबरच चीनने प्रशांत महासागरातील किरीबाती या छोट्याशा देशात आपले दूतावास सुरु केले आहे. किरीबातीचे राष्ट्रपती टेनेटी मामाऊ यांना बीजिंग समर्थक मानले जाते. त्यांनी नुकतीच दुसर्‍या वेळी निवडणूक जिंकली आहे. आर्थिकदृष्ट्या ऑस्ट्रेलिया आतापर्यंत किरीबातीला सर्वाधिक मदत देत आला आहे. प्रशांत महासागरात चीनला सामर्थ्य वाढवायचे आहे आणि त्यासाठी हा देश महत्त्वपूर्ण ठरतो. त्यामुळे चीनने तिथेही आपला विस्तार केला आहे. किरीबातीमध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि क्युबा या तीन देशांचे दूतावास आधीपासून आहेत. सुमारे ३३  बेटांचा मिळून बनलेला हा देश सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे.


चीनच्या येथील दूतावास सुरु करण्यामागील भूमिका ही निश्चितच विस्तारवादी धोरणास चालना देणारी आहे. त्यामुळे चीनने जगाला कोरोनाचा प्रसाद दिला असताना त्यातून जग बाहेर पडण्यापूर्वीच तिथे आपले दूतावास सुरु केले. किरीबातीचे प्रशांत महासागरातील स्थान हे मोक्याचे आहे. याच भागातून आशिया खंड आणि अमेरिका यांना जोडले जाते. त्यामुळे व्यापाराच्या दृष्टीनेदेखील हे स्थान महत्त्वाचे आहे. आजवर प्रशांत महासागर म्हणजे अमेरिकेचे बलस्थान अशी ओळख रहिली आहे. मात्र, कोरोना प्रादुर्भाव आणि त्यामागचे चिनी कारण यामुळे अमेरिका व चीन संबंध सध्या ताणले गेले आहेत. अशावेळी चीनला आता अमेरिकेला आव्हान द्यायचे आहे. त्यामुळे भविष्यात येथे चीनला सैन्य तळ बांधणे दूतावासामुळे शक्य होणार आहे. किरीबाती नेहमीच ऑस्ट्रेलियाच्या जवळ राहिला आहे. २०११ ते २०१७ दरम्यान ऑस्ट्रेलियाने या देशाला ६ .२५ अब्ज डॉलरची आर्थिक मदत केली. पण आता येथे चीन अधिक बळकट होत चालला आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या तणावाचेही हे एक मोठे कारण आहे. त्यामुळे चीनने तेथे विस्ताराच्या दृष्टीने दूतावास उगडले आहे.


दुसरीकडे कोरोनामुळे अनेक दिवसांपासून बंद असलेले करतारपुर कॉरिडोर २९ जूनपासून पुन्हा खुले करण्यात येणार असल्याची माहिती पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी दिली. याबाबत भारतालादेखील कळवले. मात्र, केवळ दोन दवस आधी. करारानुसार ते सात दिवस आधी कळविणे आवश्यक होते. कोरोना महामारीमुळे कॉरिडोर तात्पुरता बंद केला होता. हा धोका अद्यापही कायम आहे. सध्या पाकिस्तानात दोन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. चार हजारांपेक्षा अधिकांचे मृत्यू झाले आहेत. असे असताना कॉरिडोर सुरु करणे म्हणजे पाक कोरोनामुक्त झाला असल्याचा संदेश देण्याचा हा प्रयत्न आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. यातून पाकिस्तान स्वत:ला मैत्री आणि शांततेचे वकील म्हणून सिद्ध करण्याचा कट रचत आहे, असेच दिसून येते. कॉरिडोर खुले करण्यापूर्वी रावी नदीवर आवश्यक असणारी पूल बांधणी करणेही पाकला अजून शक्य झालेले नाही. तरीही आपले मनाचे खोटे मोठेपण दाखविण्यात पाक धन्यता मानत आहे. नेपाळने वारंवार भारताशी आगळीक करण्याचा प्रयत्न सध्या चालविला आहे. भारत-नेपाळच्या बिहार येथील सीमेवर नेपाळने आपले सैन्य जमविण्यास सुरुवात केली आहे. तसेच यापूर्वी चीनच्या पावलावर पाऊल टाकत भारतासमवेत बालिश वर्तन केले आहेच. जगात मानवी आरोग्य आणि कोरोनापश्चात जीवनमान याबाबत चिंता असताना हे तीन देश भलत्याच बाबतीत पुढाकार घेत आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तान व नेपाळ यांच्या कृत्यांच्या केंद्रस्थानी चीन आहे. हे सहज दिसून येते. त्यामुळे आपल्या या कृतींनी आगामी काळात या देशांचे जागतिक स्तरावरील मानाचे स्थान नक्कीच धोक्यात येईल यात शंका नाही.
@@AUTHORINFO_V1@@