'१९६२मध्येही चीनने भारताचा भाग बळकावला ; आरोप करताना भूतकाळ पाहावा'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2020
Total Views |

indo china sharad pawar_1




मुंबई :
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधींवर निशाना साधत शनिवारी काँग्रेसने राष्ट्रीय सुरक्षा प्रश्नांवर राजकारण करू नये, असे सांगितले. १९६२च्या युद्धाचा उल्लेख करत ते म्हणाले की, एखाद्यावर आरोप करताना भूतकाळात काय घडले याकडेही लक्ष दिले पाहिजे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर चीनच्या हल्ल्याविरोधात शरणागती पत्करल्याचा आरोपाच्या संदर्भात शरद पवार यांनी हे विधान केले.




१९६२च्या युद्धानंतर चीनने भारताचा ४५ हजार किलोमीटरचा भूभाग बळकावला होता. तो आजही परत मिळालेला नाही, अशी आठवण करून देतानाच राष्ट्राच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण करू नका, अशा शब्दांत शरद पवार यांनी राहुल गांधी यांचे कान टोचले आहेत. पुढे पवार म्हणतात, “जेव्हा जेव्हा चिनी सैनिकांनी भारतीय भूमीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपल्या सैनिकांनी चिनी सैनिकांना मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. हे एखाद्याचे अपयश किंवा संरक्षणमंत्र्यांचे अपयश आहे असे म्हणणे योग्य नाही. आपली सेना सतर्क नसती तर चिनी सैन्य कधी आलं आणि गेलं हे कळलंही नसतं. " पवार यांनी भारत आणि चीन यांच्यातील कराराचा हवाला देत दोन्ही देशांनी एलएसीवर तोफा न वापरण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.



भारत-चीन युद्ध होण्याची शक्यता नाही

भारत- चीन प्रश्न हा संवेदनशील आहे. चीनने गलवान खोऱ्यात कुरापती काढली हेही खरे आहे. मात्र, असे असले तरी भारत-चीन युद्ध होण्याची शक्यता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सियाचीनशी संपर्क साधण्यासाठी आपण गलवान खोऱ्यात रस्ता करत आहोत. गलवान खोऱ्यात आपल्याच हद्दीत आपण रस्ता करत असून त्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरण्याची सोय करत आहोत. या रस्त्याचे काम सुरू असताना चीनचे सैन्य समोर आले आणि आपल्या सैनिकांसोबत त्यांची झटापट झाली, असे पवार म्हणाले.



सर्वपक्षीय बैठकीत पवारांनीही केंद्र सरकारचे समर्थन केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गलवण खोऱ्यात भारत-चीन संघर्षांनंतर बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, सीमेवरचे सैनिक शस्त्रे घेऊन जातात की नाहीत हा निर्णय आंतरराष्ट्रीय कराराद्वारे घेतला जातो आणि त्यात राजकीय पक्षांनी हस्तक्षेप करू नये. १९९३मध्ये संरक्षणमंत्री असताना मी चीनला गेलो होतो. त्यावेळी हिमालयीन बॉर्डवर सैन्य कमी करण्याबाबत सहा दिवस चर्चा झाली. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव चीनला गेले आणि त्यांनी दोन्ही बाजूचं सैन्य कमी करण्याचा करार झाला. शरद पवार पंतप्रधान नरसिंह राव यांच्या काळात कॉंग्रेस सरकारमध्ये संरक्षणमंत्री राहिले आहेत. १९६२च्या भारत-चीन युद्धानंतर ते प्रथमच दोन्ही देशांमधील शांततेसाठी होणाऱ्या प्रयत्नांच्या सहभागी होते. १९९३मध्ये संरक्षणमंत्री म्हणून तेच 'पीस अँड ट्रंक्विलिटी' करारावर स्वाक्षरी करण्यासाठी चीनमध्ये गेले होते.



@@AUTHORINFO_V1@@