अनंतनागमध्ये दहशतवाद्यांचा जवानांवर हल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2020
Total Views |

anantnag_1  H x





श्रीनगर :
काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारा येथे शुक्रवारी दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर गोळीबार केला. यामध्ये एका जवानासह एका मुलाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजबेहारा येथील पाडशाही बाग जवळ दुपारी १२:१० वाजता ही घटना घडली. दहशतवादी हल्ल्यात जखमी जवान व मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. सुरक्षा दलाने संपूर्ण परिसर घेरला असून शोध मोहीम सुरू आहे. मात्र, किती दहशतवाद्यांनी हल्ला केला हे कळू शकले नाही. मुलाचे वय पाच ते सहा वर्षे असल्याचे सांगितले जाते.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला आहे. जेव्हा सीआरपीएफची गस्त झिरपोरा महामार्गावरुन जात होती, तेव्हा हे हल्लेखोर आधीपासून तेथे लपून बसले होते. सीआरपीएफचे वाहन जवळ येताच दहशतवाद्यांनी त्यावर गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी सात वर्षांचा लहान मुलगा नेहानलाही गोळ्या घालण्यात आल्या. हल्लाकरताच हे दहशतवादी तेथून पळून गेले. जखमी जवान व मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल केले गेले, परंतु डॉक्टरांनी तपासणी केल्यावर, एका जवानाला मृत घोषित करण्यात केले. त्याचवेळी,लहान मुलाचादेखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, अन्य जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत. एसओजी, सैन्य आणि सीआरपीएफच्या जवानांनी घटनास्थळाभोवतीचा परिसर घेरला आहे. हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. इतर तपशील वाट पाहत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@