आयआयटी दिल्लीच्या प्राध्यापकाने तयार केली 'स्वदेशी पीपीई कीट'!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2020
Total Views |
IIT delhi_1  H

निर्जंतुककरून तब्बल पाचवेळा वापरता येणार हे स्वदेशी पीपीईकीट! 

नवी दिल्लीः आयआयटी दिल्लीच्या प्राध्यापकाने अवघ्या ३०० ग्रॅम वजनाचे सर्वात हलके पीपीई कीट तयार केले आहे. या पीपीई कीटची खासियत म्हणजे ती तब्बल पाच वेळा वापरता येणार आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या पीपीई किटची किंमत सुमारे १००० रुपये आहे. तर या स्वदेशी पीपीई किटची किंमत ८०० रुपये असणार आहे. बाजारात मिळणारे हे किट फक्त एकदाच वापरणे शक्य असते, तर कमी किमतीचे स्वदेशी पीपीई किट तीन ते पाच वेळा वापरत येणार असल्याने ते फायदेशीर ठरणार आहे. कानपूर येथील एका कंपनीतही त्याचे उत्पादन सुरू झाले आहे.


वस्त्रउद्योग तंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक डॉ. एस.एम. इश्तियाक आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक विद्यार्थ्याने हे किट तयार केले आहे. प्राध्यापक इश्तियाक यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना बाधित रूग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल कर्मचार्‍यांना ही किट अत्यंत उपयुक्त ठरेल. हे पीपीई किट सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सर्व मानकांना लक्षात घेऊनच तयार केली आहे. सोडियम हायड्रोक्लोराईड आणि हायड्रोजन ऑक्साईड द्रावणात एक वेळ वापरल्यानंतर ३० मिनिटे भिजवून त्याचा पुन्हा वापर केला जाऊ शकतो. असे केल्याने किट पाच वेळा वापरली जाऊ शकत असल्याचे डॉ. इश्तियाक यांनी सांगितले.


ही पीपीई किट केवळ व्हायरसच नाही तर जीवाणूंचा धोका देखील ९९.९ टक्क्यांनी कमी करते. तर परिधान करण्यास देखील खूप सोयीस्कर आहे. किट अशा प्रकारे डिझाइन केलेले आहे की ते परिधान केल्यावर श्वास घेण्यास अडचण येत नाही. आयआयटी दिल्लीतर्फे तयार केलेले हे पीपीई कीट वेगवेगळ्या आकारात बनवले जात आहे. सध्या बाजारात पीपीई मिळणे काही लोकांच्या आकारात मोठे आहे किंवा ते काही लोकांना पूर्ण कव्हर देऊ शकत नाहीत. त्यामुळे हे स्वदेशी पीपीई कीट सर्वांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@