दिलासादायक ! देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५८.२४ टक्क्यांवर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2020
Total Views |

recover _1  H x




नवी दिल्ली :
कोरोनाच्या प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारसह राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या श्रेणीबद्ध, पूर्व-प्रभावी आणि कृतीशील उपाययोजनांमुळे उत्साहवर्धक परिणाम दिसत आहेत. त्यामुळे आता देशात सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेले रुग्ण ९६,१७३ हून अधिक आहेत.



गेल्या २४ तासात कोरोनाचे एकूण १३,९४० रुग्ण बरे झाले त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २,८५,६३६ झाली आहे. यामुळे आता कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ५८.२४ % वर पोहोचले आहे. सध्या १,८९,463 सक्रिय रुग्ण असून ते सर्व सक्रिय वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत. कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याच्यादृष्टीने प्रयोगशाळांचा विस्तार करण्याच्या उद्देशाने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने गेल्या २४ तासात ११ नवीन प्रयोगशाळा सुरु केल्या आहेत. भारतात सध्या कोरोना समर्पित १०१६ निदान प्रयोगशाळा आहेत. यात सरकारी क्षेत्रातल्या ७३७ आणि २७९ खाजगी प्रयोगशाळांचा समावेश आहे.


कोरोना चाचणी  सद्यस्थिती खालीलप्रमाणे आहेः

जलद आरटी पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा : ५६० (सरकारी: ३५९ + खाजगी: २०१)


ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा: ३६९ (सरकारी : ३४६ + खाजगी: २३ )


सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा: 87 (शासकीय : ३२ + खाजगी: ५५ )


कोरोनाचे नमुने तपासणीची संख्याही दररोज वाढत आहे. गेल्या २४ तासात प्रयोगशाळेत २,१५,४४६ चाचण्या करण्यात आल्या. आजपर्यंत एकूण ७७,७६,२२८नमुने तपासण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@