मशिदीच्या भोंग्याविरोधात उठवला 'आवाज' !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2020
Total Views |
Mankhurd Massid Speaker_1



आमदारासह स्थानिकांनी दिला घर सोडून जाण्याचा सल्ला






मुंबई : आमची आरती त्रास देत नाही मग तुमचा 'अजान' का त्रास देतोय ?, असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भर सभेत विचारत मशीदीतील भोंग्यांबद्दल प्रश्न विचारला होता. अलाहाबाद उच्च न्यायालयानेही लाऊड स्पीकरवरून अजाण देणे हा इस्लामचा भाग नाही, असा निर्णय सुनावला. मात्र, मशिदीतील भोंग्यांविरोधात प्रश्न विचारणाऱ्यांना कशी दंडुकेशाही दाखवली जाते याचा प्रत्यय मानखुर्दच्या एका तरुणीला आला. २४ जूनच्या घटनेबद्दल तीव्र पडसाद उमटत आहेत.


मानखुर्द भागात राहणाऱ्या करीश्मा भोसले या तरुणीने घराबाहेरील मशीदीच्या भोंग्याचा आवाज कमी करण्याची विनंती केली होती. दिवसातून पाच वेळा वाजणाऱ्या या भोंग्याचा आम्हाला त्रास होतो, त्यावर उच्चारली जाणारी अजाण आम्हाला समजत देखील नाही, मग आमच्याच घराबाहेर हा भोंगा का लावला जात आहे, असा प्रश्न तिने विचारला होता. मात्र, सहाजिकच मानखुर्दसारख्या मुस्लीम बहुल भागात तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. 


भोंग्याचा आवाज कमी करायला मशीद तुझ्या बापाची आहे का, असा उलटा जाब मशीदीतील लोकांनी तिला विचारत हुसकावून लावले. हे प्रकरण मानखुर्द पोलीसांत गेल्यावर संबंधित मुलीलाच दरडावून या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. गेली २० वर्षे अजाण लाऊडस्पीकरवर सुरू आहे, आम्ही ती बंद किंवा आवाज कमी करणार नाही, अशी दमदाटी तिथल्या महिलांकडून तिला करण्यात आली आहे.


आपल्या ट्विटमध्ये ती म्हणते, "माझे इथे ऐकणारे कुणीच नाही. हिंदू दडपणाखाली आहेत, आवाज कमी करण्यासाठी संबंधितांना मी सांगितल्यावर तिथले स्थानिक माझ्या भोवती जमले, मला उलट प्रश्न विचारू लागले. इथले स्थानिक आमदार अबू आझमीही माझे म्हणणे ऐकत नाहीत. 'त्रास होत असेल तर घर सोडून जा', असा सल्ला मला देण्यात आला."






करीश्मा जेव्हा मशिदीच्या भोंग्याचा आवाज कमी करा, असे सांगण्यासाठी गेली तेव्हा तिचा व्हीडिओ बनवून व्हायरल करण्यात आला. तिझ्याबद्दल वादग्रस्त संदेश व्हॉट्सअॅपवर व्हायरल करा, असे आवाहन तिथल्या स्थानिकांनी केले. केवळ मशिदीच्या भोंग्याचा आवाज कमी व्हावा, अशी मागणी करणाऱ्या एका मुलीला इतके हाल सोसावे लागत आहेत. 








दरम्यान, याबद्दल सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. करीश्माने पोस्ट केलेले व्हीडिओज १५ हजार जणांनी पाहिले आहेत. मला न्याय मिळायला हवा, घरासमोरील भोंग्याचा आवाज कमी व्हावा, अशी मागणी तिने केली आहे. पोलीसांत तक्रार करणाऱ्या करीश्माला पोलीसांनीच घटनास्थळाहून घरी जाण्यास सांगितल्याचाही एक व्हीडिओ तिने ट्विट केला आहे.





@@AUTHORINFO_V1@@