अखेर जिम, सलूनचे टाळे उघडणार! राज्य सरकारचा निर्णय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2020
Total Views |

Gym Salun_1  H
मुंबई : गेली ३ महिने राज्यात लॉकडाऊन होता. लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वात मोठा प्रश्न उभा होता तो जिम आणि सलून कामगारांचा. लॉकडाऊननंतर आता अनलॉक १ मध्ये अनेक दुकाने आणि कार्यालयांना अटींसह मान्यता दिली. मात्र, गेले ३ महिने बंद असलेल्या जिम आणि सलून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितल्यानुसार, येत्या २८ जूनपासून जिम आणि सलून सुरु होणार आहेत.
 
 
गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सलूनचा व्यावसाय सुरु करण्याबाबत चर्चा झाली. यानंतर कोरोनाची विभागवार परिस्थिती लक्षात घेऊन सलून व्यावसाय सुरु करण्यात येणार आहे. तसेच याबाबत सरकारकडून लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील, असे अस्लम शेख यांनी सांगितले. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीचा राज्यातील लाखो सलून व्यावसायिकांना फटका बसला आहे. अनेकांवर त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना सोशल डिस्टसिंग तसेच स्वच्छतेचे नियम पाळून आपला व्यवसाय सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी सलून चालकांकडून करण्यात येत होती.
@@AUTHORINFO_V1@@