इम्रान खान म्हणतात दहशतवादी ओसामा बिन लादेन 'शहीद'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2020
Total Views |

Imran khan _1  



इस्लामाबाद
: आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची दहशतवादाला आश्रय देण्यावरून पोलखोल झाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत केलेल्या भाषणात 'अल-कायदा'चा म्होरक्या ओसामा बिन लादेनला 'शहीद' झाल्याचा किताब दिला.



इतकेच नव्हे तर दहशतवादाविरूद्धच्या लढ्यात पाकिस्तानने अमेरिकेला पाठिंबा द्यायला नको होता असेही इम्रान खान म्हणाले. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे हे वादग्रस्त वक्तव्य अशावेळी आले आहे जेव्हा त्यांच्यावर चहूबाजूंनी दहशतवाद्यांना आसरा दिल्याचा आरोप होत आहे. गुरुवारी संसदेत इम्रान खान म्हणाले की, अमेरिकन सैन्याने पाकिस्तानमध्ये प्रवेश केला आणि लादेनला 'शहीद' केले आणि पाकिस्तानलाही सांगितले नाही. अमेरिकेच्या या कारवाईमुळेच संपूर्ण जगाने पाकिस्तानचा अपमान करण्यास सुरुवात केली. खान म्हणाले की, अमेरिकेच्या दहशतवादाविरूद्ध युद्धात पाकिस्तानने आपले ७० हजार नागरिक गमावले. ते म्हणाले की, या घटनेमुळे पाकिस्तानबाहेरील लोकांना देखील खूप त्रास सहन करावा लागला.


 


लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांसारख्या संस्थांपर्यंत पोहोचणार्‍या निधीवर पाकिस्तानला आजपर्यंत निर्बंध आणता आला नाही. त्यामुळे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) बुधवारी निर्णय घेतला की, सध्या पाकिस्तानला राखाडी यादीमध्ये ठेवले आहे. अशावेळी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे हे विधान दहशतवादाला पाकिस्तानचा असणारा पाठिंबा स्पष्टपणे दर्शवित आहे.

@@AUTHORINFO_V1@@