केंद्रीय पथक गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगणा दौऱ्यावर येणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2020
Total Views |

luv agrawal_1  




नवी दिल्ली :
केंद्र सरकारचे एक पथक देशातील तीन राज्ये गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगणा येथे भेट देणार आहे. २६ ते २९ जून दरम्यान हा दौरा होईल. हे पथक संबंधित राज्यांमधील कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी होत असलेल्या उपाययोजना व राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेईल. या पथकाचे नेतृत्व केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल हे करणार आहेत. ही टीम तीन राज्यांमधील अधिकाऱ्यांसोबत संवाद साधेल यावेळी कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी प्रयत्न करतील.





महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असणारे राज्य आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचे १ लाख ४२ हजाराहून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्यापैकी ६२,३५३ सक्रिय प्रकरणे आहेत. येथे कोरोनामुळे आतापर्यंत ६ ,७३९ लोकांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये आत्तापर्यंत २९ हजारांहून अधिक कोरोनाची प्रकरणे नोंदली गेली असून त्यापैकी ६,१६९ प्रकरणे सक्रिय आहेत. यामुळे आतापर्यंत १७३६ लोक मरण पावले आहेत. तेलंगणात कोरोनाचे एकूण १०,४४४ प्रकरणे आहेत, त्यापैकी ५,७६० उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत २२५ लोक मरण पावले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@