लष्करप्रमुखांनी घेतला एलसीवरील परिस्थितीचा आढावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2020
Total Views |

mukund narawane_1 &n


लडाख :
भारत-चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी लडाख येथे दोन दिवसांच्या दौऱ्यात एलएसीवर तैनात असलेल्या जवानांमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी गलवान खोऱ्यात तैनात असलेल्या जवानांचे धैर्य वाढवत त्यांना कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार असावे असे आवाहन केले. भारत-चीन सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांच्या धैर्याचे देखील कौतुक केले आणि त्याच उत्साहाने शत्रूचा सामना करावा असे सांगितले.


लष्करप्रमुख मंगळवारी लडाख येथे दाखल झाले. ते काल संपूर्ण दिवस लेहमध्ये थांबले. येथे त्यांनी फील्ड अधिकाऱ्यांसोबत बैठक देखील घेतली. गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी झालेल्या हिंसक संघर्षात जखमी झालेल्या जवानांची देखील भेट घेतली. त्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या शौर्याचे कौतुक केले. आज त्यांच्या दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे. आज सकाळी पूर्व लडाख येथे दाखल झालेल्या लष्करप्रमुखांनी गॅल्वान व्हॅलीसह अन्य भागात सुरक्षा परिस्थितीचा बारीक आढावा घेतला. या दरम्यान त्यांनी भारत-चीन सीमांच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या सैन्याशीही संवाद साधला.
@@AUTHORINFO_V1@@