कोरोनील प्रकरणी रामदेव बाबा अडचणीत ; कारवाई होण्याची शक्यता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2020
Total Views |

Ramdev baba_1  
 
नवी दिल्ली : सध्या जगभरामध्ये कोरोनावर अद्याप कुठलेही औषध किंवा लस शोधण्यात आलेली नाही. देशामध्येही कोरोणाचा प्रादुर्भाव वाढत असताना रामदेव बाबा यांच्या पतंजलीने ‘कोरोनील’ हे औषध बाजारात आणून हे कोरोनावर प्रभावशाली असल्याचा दावा केला. मात्र, आता याच औषधामुळे पतंजली आणि रामदेव बाबा हे चांगलेच अडचणीत येणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. कोरोनावर कोरोनील हे औषध प्रभावी असल्याचा दावा हा संपूर्णपणे खोटा असल्याचे राजस्थान राज्य सरकारचे म्हणणे आहे. तर, उत्तराखंड आयुर्वेद ड्रग्ज लायसन्स अथॉरिटीने बाबा रामदेव यांच्या ‘कोरोनील’ या औषधावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नोटीस बजावली आहे.
 
 
राजस्थानचे आरोग्यमंत्री रघु शर्मा यांनी म्हंटले आहे की, “ कोरोनील या औषधाचा दावा म्हणजे फसवणूक आहे. करोना साथीचा आजाराचा देशभरात कहर सुरू असताना अशा प्रकारे औषध विकण्याचा प्रयत्न करणे ही चांगली गोष्ट नाही. आमच्या एका डॉक्टरनेही याविरोधात तक्रार दाखल केली असून आम्ही यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत. आयुष मंत्रालयाच्या गॅझेट नोटिफिकेशन नुसार बाबा रामदेव यांनी आयसीएमआर आणि राजस्थान सरकारकडे करोनावरील आयुर्वेदीक औषध किंवा ट्रायलसाठी परवानगी मागायला हवी होती. मात्र तशी परवानगी न घेताच तसेच कोणतेही मापदंड न पाळता त्यांनी ट्रायलचा दावा केला आहे आणि हे कृत्य चुकीचे आहे.” मात्र, पतंजलीने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
 
 
उत्तराखंड आयुर्वेद ड्रग्ज लायसन्स अथॉरिटीने बाबा रामदेव यांच्या कोरोनिल या औषधावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नोटीस बजावली आहे. रामदेव बाबा यांची कंपनी पतंजलीला करोनावरील औषधासाठी नाही, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध बनवण्यासाठी आणि खोकला- तापावरील औषध तयार करण्याचा परवाना देण्यात आला आहे, असे अथॉरिटेचे उपसंचालक यतेंद्रसिंह रावत यांनी सांगितले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या मनात या औषधाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच, रामदेव बाबा आणि पतंजली यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ होणार आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@