आयएनएस शिवाजी येथे नौदलाच्या प्रशिक्षणार्थींना कोरोनाची लागण!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Jun-2020
Total Views |

INS shivaji_1  

तब्बल १२ जणांना कोरोनाची लागण; १८ जूनला आढळलेला पहिला रुग्ण 

पुणे : लोणावळा येथे भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाला ट्रेनिंग देणाऱ्या आयएनस शिवाजी येथील १२ प्रशिक्षणार्थींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी यासंदर्भातील माहिती जारी केली आहे. लोणावळा येथे ८०० एकरावर पसरलेल्या नौदल फॅसिलिटीवर ५००० लोक राहतात. यात ३००० नौदल कर्मचारी, अधिकारी, प्रशिक्षणार्थी आणि इतर स्टाफचा समावेश आहे. तर उर्वरीत २००० लोकांमध्ये नौदल अधिकारी आणि स्टाफच्या कुटुंबियांचा समावेश आहे.


आयएनएस शिवाजीमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण १८ जून रोजी सापडला होता. लॉकडाऊननंतर सुटी घेऊ घरी गेलेले आणि परतलेल्या १५७ प्रशिक्षणार्थींपैकी तो एक होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, लॉकडाउन उघडल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात अनलॉक १ ची सुरुवात झाली होती. यातच १५७ ट्रेनींच्या बॅचला वाढीव सुटी देण्यात आली होती. ट्रेनिंगला परतल्यानंतर सर्वांना १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले होते. युनिटमध्येच त्यांची क्वारंटाइनची व्यवस्था करण्यात आली होती. क्वारांटाइन पीरिअडमध्येच एका ट्रेनीला कोरोनाची लक्षणे दिसून आली. चाचणी केली असता १८ जून रोजी त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला.


पहिला रुग्ण पॉझिटिव्ह निघाला तेव्हापासून हाय रिस्क असलेल्या आणि त्या रुग्णासोबत थांबलेल्यांच्या नियमाप्रमाणे चाचण्या घेतल्या जात आहेत. यासाठी सर्वच प्रकारच्या वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहेत. आतापर्यंत १५७ पैकी १२ ट्रेनी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. कोरोनाचा धोका केवळ क्वारंटाइन केलेल्या ब्लॉक्सपैकी एकाच ब्लॉकमध्ये आहे. तरीही सर्वांसाठी योग्य ती काळजी आणि उपाययोजना केल्या जात आहेत असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


@@AUTHORINFO_V1@@