डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील ‘H1B’ व्हिसा वर्षअखेरीपर्यंत केले रद्द!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jun-2020
Total Views |

Donald trump_1  


अमेरिका स्थित भारतीय आयटी कर्मचाऱ्यांना बसणार मोठा फटका!

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B, H-4, H-2B Visa, J आणि L Visa हे तात्पुरते दिले जाणारे व्हिसा वर्षअखेरीपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे सुमारे ५२५००० कामगारांना फटका बसण्याची शक्यता आहे. तर अमेरिकेमध्ये ग्रीन कार्डच्या माध्यमातून प्रवेश करणार्‍या सुमारे १लाख ७० हजार भारतीयांचादेखील त्यामध्ये समावेश आहे. दरम्यान ट्रम्प सरकारच्या या निर्णयामधून आरोग्य यंत्रणेशी निगडीत व्यक्ती, फूड आणि अ‍ॅग्रीकल्चर इंडस्ट्रीमधील व्यक्तींना वगळण्यात आले आहे. हा निर्णय कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे.


दरम्यान डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या या निर्णयावर अनेक कंपन्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. टेक्नॉलॉजीशी निगडीत अनेक कंपन्यांच्या मते या काळात कुशल मनुष्यबळ अमेरिकेत न येणे हे नुकसानकारक आहे. अमेरिकेच्या लॉ मेकर्स कडून हा निर्णय ट्रम्प सरकारने मागे घ्यावा असे सुचवण्यात आले आहे.


H1 B व्हिसा हा अप्रवासी व्हिसा आहे. याच्या माध्यमातून अमेरिकन कंपन्यांमध्ये परदेशातून नोकरीसाठी संधी मिळते. प्रामुख्याने टेक्निकल आणि थेरॉटिकल कौशल्य असणार्‍यांची निवड केली जाते. सर्वसाधारणपणे ३ महिने ते ५ वर्ष अशा कालखंडासाठी हा व्हिसा दिला जातो. ३-४ लाख भारतीय कामगार हे अमेरिकेमध्ये ‘H1 B’ व्हिसावर जाऊन नोकरी करतात. यामध्ये इंफोसिस, टाटा, व्हिप्रो, कॉन्ग्निझंट सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. त्यामुळे अमेरिकेच्या नव्या व्हिसा धोरणामुळे आता अनेक आयटी कंपन्यांचे प्रोजेक्ट्स पूर्ण होण्याची प्रक्रिया मंदावणार आहे.



@@AUTHORINFO_V1@@