काँग्रेसने करार करून चीनला जमीन दिली : जे. पी. नड्डा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jun-2020
Total Views |
jp nadda_1  H x


ट्विट करत नड्डा यांनी केले काँग्रेसवर आरोप

दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन सीमेच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीत शाब्दिक चकमक सुरू आहे. भारत-चीन सीमावाद प्रकरणावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून केंद्राकडून याचे उत्तर मागितले. त्यावर भाजपाने त्वरित प्रत्युत्तर देत राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसवरही टीका केली. नड्डा यांनी ट्विट करत म्हंटले की, “काँग्रेस आधी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी करार करते आणि नंतर देशातील भूभाग त्यांना देते!”


गेल्या काही दिवसांपासून लडाख येथील भारत चीन सीमेच्या वादावरून राहुल गांधी हे केंद्र सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज पुन्हा त्यांनी एक ट्विट केले. “चीनच्या आक्रमणाविरुद्ध आम्ही एकत्र आहोत. पण भारतीय भूभाग चीनने बळकावला आहे का?”





जे पी नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर ट्विटरवरून टीका केली – “काँग्रेस आधी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीसोबत करार करते. त्यानंतर काँग्रेस चीनला जमीन सरेंडर करते. डोकलाम येथील तणावानंतर राहुल गांधी लपून चीनच्या दूतावासात गेले होते. या आव्हानात्मक काळात राहुल गांधी देशाचं विभाजन करू इच्छितात आणि जवानांचे मनोबलही कमी करतात. कराराचा प्रभाव?”


मागील आठवड्यात सोमवारी गलवान खोऱ्याच्या क्षेत्रात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये चकमक झाली होती. त्यामध्ये २० भारतीय जवान शहीद व चीनचे ४० जवान ठार झाले होते.





@@AUTHORINFO_V1@@