पुलवामा चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jun-2020
Total Views |
pulwama_1  H x


चकमकीदरम्यान एक सीआरपीएफ जवान शहीद

पुलवामा : जम्मू काश्मीरमधील पुलवामा बंडझू भागात भारतीय सैन्य आणि पोलिसांनी चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. आज पहाटेच्या सुमारास याठिकाणी दोन्ही गटांमध्ये चकमक सुरु झाली होती. यावेळी चकमकीत गोळी लागुन सीआरपीएफचे एक जवानसुद्धा शहीद झाले आहेत. चकमकी दरम्यान गोळी लागल्याने जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराच्या दरम्यान त्यांचा मृत्यु झाला. पोलिसांनी ठार झालेल्या दहशतवाद्यांकडुन २ एके ४७ बंदुका जप्त केल्या आहेत. तर या भागात अजुनही सर्च ऑपरेशन सुरु आहे.


दक्षिण काश्मीर मधील बंडझु भागात दहशतवादी अड्डा असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीपासुनच सर्च ऑपरेशन आरंभले होते, या वेळी दहशतवाद्यांकडुन सुरुवातीला ऑपरेशन मधील जवानांवर गोळीबार केला गेला. याला प्रत्युत्तर देताना भारतीय जवानांनी सुद्धा दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दरम्यान, सोमवारी पुलवामा मधीलच बाटांगूड भागात सीआरपीएफ च्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
@@AUTHORINFO_V1@@