'मन की बात'द्वारे सुचली कल्पना, उभे केले स्वतःचे स्टार्टअप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2020
Total Views |
startup_1  H x








नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीद्वारे 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरीकांना आपला संदेश पोहोचवण्या प्रयत्न केला. काही युवकांना हा कार्यक्रम ऐकून एक स्टार्टअप सुरू करण्याची कल्पना सुचली. वाराणसीतील युवकांनी शेतकऱ्यांना फायदा पोहोचेल, असा स्टार्टअप व्यवसाय सुरू केला आहे. यामुळे अनेकांना रोजगार मिळण्याचा दावाही केला आहे.


कंपनी आता लोकांना मोफत फ्रॅन्चायझीही देण्याचा विचार करत आहे. राकेश त्रिपाठी आणि आशुतोष गुप्‍ता यांनी हा व्यवसाय यशस्वी करून दाखवला आहे. <a href='http://banarasisabji.com/'>banarasisabji.com</a> या वेबसाईटच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. याद्वारे ऑनलाईन भाजी विक्री केली जाते.
राकेश यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादच्या ऑनलाईन भाजी विक्री वेबसाईटद्वारे ही माहिती त्यांना मिळाली. अशीच वेबसाईट सुरू करावी, अशी इच्छा त्याच्या मनात होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या हितासाठी व्यवसाय कल्पना पुढे आणण्याचे आवाहन केले होते.



राकेश वाराणसीतील संपूर्णानंद महाविद्यालयातील एमबीए विद्यार्थी आशुतोष गुप्ता याला भेटला. दोघांनी मिळून या कल्पनेवर काम करण्याची सुरुवात केली. <a href='http://banarasisabji.com/'>banarasisabji.com</a> या वेबसाईटवर प्रत्येक प्रकारच्या भाज्या उपलब्ध आहेत. या भाज्यांचे दर तसेच विक्रेत्यांचा संपर्क क्रमांकही दिला जातो. दोन तासांच्या आत भाजी पोहोचवली जाते. १२० रुपयांहून जास्त भाजी विकत घेतल्यावर घरपोच सुविधा मोफत दिली जाते. दोन ते तीन ग्राहकांनी १२० रुपयांपेक्षा जास्त भाजी खरेदी केल्यांनंतर डिलिव्हरी चार्च आकारला जात नाही. जानेवारी २०१६ मध्ये सुरू केलेल्या या व्यवसायाला वर्षाच्या सुरुवातीलाच दोन लाख रुपये नफा मिळाला होता. <ahref='http://banarasisabji.com/'>banarasisabji.com</a> (बनारस सब्जी) या वेबसाईटला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लॉकडाऊनच्या काळात हजारो ग्राहकांनी ऑनलाईन भाजी खरेदीला पसंती दिली. यामुळे युवकांना रोजगारही मिळत आहे. 




एकूण ५० जण या माध्यमातून रोजगार मिळवतात. कंपनी वस्तू विक्रीसाठी दिव्यांगांतर्फे बनवण्यात आलेल्या पिशव्यांचा वापर करते. त्यामुळे त्यांच्या ऱोजगारालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा दोन्ही उद्योजकांना आहे. आपल्या स्टार्टअपचा विस्तार वाराणसीच नव्हे तर मुंबईसह देशभरातील प्रमुख शहरांमध्ये करण्याची इच्छा आहे, असे त्यांनी सांगितले. ज्यांना या उद्योगात सामिल व्हायचे आहे, त्यांना मोफत फ्रेंचाइजी देण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. पोलीस व्हेरिफिकेशन आणि अन्य प्रक्रीया पूर्ण झाल्यास हा व्यवसाय सुरू करता येईल. कमाईचा एक हिस्सा बंगालच्या एका अंधशाळेला दान करण्याची इच्छा कंपनीने व्यक्त केली आहे. राकेश यापूर्वी तिथे शिक्षक होते. भविष्यात या माध्यमाद्वारे महिलांना व्यासपीठ देण्याची तयारी करत आहेत.


@@AUTHORINFO_V1@@