भूकंपाच्या धक्क्यांनी मिझोरम हादरले!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2020
Total Views |

Earthquake_1  H


५.५ रिश्टर स्केलच्या भूकंप; गेल्या तीन दिवसांत दुसऱ्यांदा भूकंप


नवी दिल्ली : मिझोरम राज्य सोमवारी पहाटे पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. पहाटे ४.१० मिनिटांनी या भूकंपाची धक्के जाणवले. मिझोरम राज्यातील चंपाई परिसरात भूकंपाचा केंद्र बिंदू होता. या भूकंपाची नोंद ५.५ रिश्टर स्केल इतकी झाली. दरम्यान, भूकंपामुळे झालेल्या कोणत्याही जीवित अथवा वित्त हानी झालेली नाही. मिजोरम राज्यात गेल्या तीन दिवसांमध्ये दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले. या आधी शुक्रवारीही या राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते.


शुक्रवारी झालेला भूकंप हा काहीसा कमी तीव्रतेचा होता. शुक्रवाच्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.० इतकी झाली होती. तीन दिवसांच्या फरकाने मिझोरम राज्यात दुसऱ्यांदा भूकंप आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, भूकंपाच्या कारणांवरुन अभ्यासकांमध्ये वेगवेगळे प्रवाह पाहायला मिळत आहेत. काही अभ्यासकांच्या मते अशा हलक्या हलक्या भूकंपामुळे मोठ्या भूकंपाची तीव्रता कमी होत जाते. तर काही अभ्यासकांना वाटते की असे भूकंप भविष्यातील मोठ्या भूकंपाचे संकेत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@