संरक्षण आणि धोरणात्मक भागीदारीवर चर्चेसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाला रवाना!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2020
Total Views |

rajnath singh_1 &nbs



तीन दिवसीय दौऱ्यात राजनाथ सिंह मॉस्कोमधील ७५ व्या विक्ट्री परेड डेमध्ये होणार सहभागी

नवी दिल्ली : भारत-चीन तणावा दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सोमवारी तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दोन देशांच्या दरम्यान संरक्षण आणि धोरणात्मक भागीदारीवर चर्चा होणार आहे. यासोबतच भारत ‘एस४०० ट्रायम्फ एन्टी मिसाईल सिस्टम’ डिलीवरीमध्ये गती आणण्याच्या बाबीवर जोर दिला शकतो. राजनाथ सिंहांचा हा दौरा चीन आणि भारत दरम्यानच्या हिंसक चकमकीच्या ६ व्या दिवशी होत आहे. १५ जून रोजी घडलेल्या चकमकीमध्ये गलवान घाटीत २० भारतीय सैनिक शहीद झाले होते. तर अद्याप हा वाद शमलेला नाही.





रवाना होण्यापूर्वी संरक्षण मंत्र्यांनी ट्विटकरत याबाबत माहिती दिली. 'रशियाच्या भेटीचा दौरा भारत-रशिया दरम्यान संरक्षण आणि धोरणात्मक भागीदारीवर चर्चा होईल. मी मॉस्कोमध्ये ७५ व्या विक्ट्री परेड डेमध्ये देखील सभागाही होणार आहे', असे त्यांनी म्हंटले आहे. राजनाथ सिंह यांचे संरक्षण सचिव अजय कुमार देखील त्यांच्यासोबत दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.


कोरोना संकटामुळे रशियाने एस४०० डिफेंस सिस्टमची डिलीवरी डिसेंबर २०२१पर्यंत लांबणीवर टाकली आहे. या मिसाईलसाठी भारताने गेल्या वर्षीच रशियाला ५.४ बिलियन डॉलर (४० हजार कोटी रुपये) दिले आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंह आपल्या प्रवासादरम्यान चीन आणि भारत सीमेवरील तळावर रुसचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू यांना माहिती देतील. तर, या दरम्यान राजनाथ सिंह यांची चिनी अधिकाऱ्यांसोबत भेट होणार नाही. कोरोना संकटाच्या काळात भारतीय नेत्याची ही पहिली विदेश यात्रा असणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@