कोरोनावर आस्थेचा विजय ! जगन्नाथ यात्रेला सशर्त परवानगी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2020
Total Views |
Jagannath Yatra _1 &




नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने काही निर्बंधानुसार ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ रथयात्रेला सशर्त परवानगी दिली आहे. भाविकांच्या आरोग्याशी कुठलीही तडजोड न करता मंदिर समिती, राज्य व केंद्र सरकारने समन्वय साधून ही यात्रा आयोजित करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.



सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने संपूर्ण यात्रेबद्दल सुनावणी घेतली होती. तीन सदस्यांच्या खंडपीठात न्यायमूर्ती एस ए बोबड़े, न्या. ए एस बोपन्ना, न्या. दिनेश माहेश्वरी यांचा सामावेश होता. पुरीचे जिल्हाधिकारी बलवंत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, रथयात्रेसाठी श्रीक्षेत्र धाम पूर्णपणे तयार आहे. न्यायालयाच्या सर्व निर्देशांचे पालन करायला आम्ही तयार आहोत. श्रीजगन्नाथ मंदिर के मुख्य प्रशासक डॉ. किशन कुमारच्या अध्यक्षतेत स्थानिकांच्या झालेल्या बैठकीत पुरी एसपी उमाशंकर दास यांच्यासह शहरातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@