खरंच पश्चाताप झाला?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2020
Total Views |

steve bucknere_1 &nb


मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला दोनवेळा चुकीचे बाद ठरवल्याची जाहीर कबुली बकनर यांनी दिली. बकनर यांना आपल्या कृत्याचा अनेक वर्षांनंतर पश्चाताप झाल्याचे अनेकांना आश्चर्य वाटले. याचे कारणही तसेच आहे. कारण, क्रिकेटविश्वात एखादी गोष्ट जेव्हा अनावधानाने घडते, तेव्हा अनेक जण तातडीने याबाबत दिलगिरी व्यक्त करतात.



वेस्ट इंडिज संघाचे माजी खेळाडू आणि एकेकाळचे नावाजलेले पंच स्टीव्ह बकनर यांनी गेल्या काही वर्षांत घडलेल्या आपल्या कृत्याचा पश्चाताप व्यक्त केला. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला दोनवेळा चुकीचे बाद ठरवल्याची जाहीर कबुली बकनर यांनी दिली. बकनर यांना आपल्या कृत्याचा अनेक वर्षांनंतर पश्चाताप झाल्याचे अनेकांना आश्चर्य वाटले. याचे कारणही तसेच आहे. कारण, क्रिकेटविश्वात एखादी गोष्ट जेव्हा अनावधानाने घडते, तेव्हा अनेक जण तातडीने याबाबत दिलगिरी व्यक्त करतात. उदाहरण घ्यायचेच झाले तर सायमन टफल यांचे घेता येईल. एकेकाळी सायमन टफल हे पहिल्या क्रमांकाचे पंच म्हणून क्रिकेट विश्वात प्रसिद्ध होते. सायमन टफल अचूक निर्णय देण्यासाठी प्रसिद्ध असल्याने अनेक महत्त्वपूर्ण सामन्यांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) त्यांची नेमणूक करण्यात येत असे. अशा सायमन टफलसारख्या पंचांकडूनही सचिनला एकेकाळी चुकीचे बाद ठरवण्यात आले. सेंच्युरीला जवळ आलेला असतानाही सचिनला चुकीचे बाद ठरवण्यात आल्याने यावरून मोठा गाजावाजा झाल्याने सायमन टफल यांनी तात्काळ जाहीर माफी मागितली होती.



केवळ सायमन टफल यांनीच नाही, तर अनेक पंचांबाबत असे घडले. परंतु, जवळपास सर्वांनी सामन्यानंतर घडल्याप्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करत त्या वादांना तेथेच पूर्णविराम दिला होता. परंतु, वेस्ट इंडिज संघाचे पंच बकनर यांच्याबाबतीत असे काही घडले नव्हते. त्यांनी सचिनला अनेकदा चुकीचे बाद ठरवल्यानंतरही कधीही दिलगिरी व्यक्त केली नव्हती. मात्र, अनेक वर्षांनंतर बकनर यांनी दिलगिरी व्यक्त करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. बकनर यांनी इतक्या वर्षांनंतर दिलगिरी व्यक्त करावी, हे एक मोठे नवलच असल्याचे मत समीक्षक व्यक्त करत आहेत. मात्र, बनकर यांना माफी मागण्याचे आताच का सुचावे, हा देखील प्रश्न तितकाच महत्वाचा आहे. कारण, कोरोना महामारीमुळे क्रिकेटविश्व थंडावलेले असतानाही बनकर यांना आता माफी मागण्याचे शहाणपण सुचणे म्हणजे या मागे नक्की काही तरी कारण असेल, अशी शंका क्रिकेट समीक्षकांनी घेतली आहे. त्यामुळे बकनर यांना खरच पश्चाताप झाला का, हा प्रश्न निरुत्तरच ठरतो.


बकनर यांची ‘बनवाबनवी’



कोरोना महामारीच्या संकटात थंडावलेले क्रिकेटविश्व पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्नशील आहेत. ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमांचे पालन करून क्रिकेटविश्वाला पुन्हा एकदा चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून प्रयत्न केले जात असतानाच या बकनर महाशयांनी सचिनला चुकीचे बाद ठरवल्याची कबुली देत नव्या वादाला तोंड फोडले. आपल्याला पश्चाताप झाल्याचे स्पष्टीकरण बकनर यांनी दिले असले तरी अनेक क्रिकेट समीक्षकांनी बकनर यांच्या वागण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. काही क्रिकेट समीक्षकांच्या म्हणण्यानुसार बकनर यांचे हे वागणे म्हणजे अगदी बनवाबनवी असल्यासारखे आहे. कारण, ज्यावेळी बकनर यांच्या हातून भारतीय खेळाडूंना चुकीचे बाद ठरवण्यात आले होते. त्यावेळी वेस्ट इंडिजच्या अनेक माध्यमांमध्ये बकनर यांनी आपला बदला घेतल्याबाबत अनेकदा वृत्त छापून आल्याचा इतिहास आहे. क्रिकेटविश्वात १९७५ सालापासून विश्वचषक स्पर्धांना सुरुवात झाली. १९७५ , १९७९ असे सलग दोन विश्वचषक वेस्ट इंडिज संघाने जिंकले.



१९८३ साली वेस्ट इंडिज संघाला विश्वचषक जिंकण्याची हॅट्ट्रिक करायची होती. मात्र, भारताने अंतिम सामना जिंकत आपल्याला हॅट्ट्रिकपासून दूर ठेवले, हे अजूनही त्यावेळेच्या वेस्ट इंडिजच्या संघामधील खेळाडूंच्या पचनी पडत नसल्याचा इतिहास आहे. त्यामुळे बकनर हे भारतीय खेळाडूंच्या बाबतीत अनेकदा तिरस्काराने वागत असल्याचा इतिहास आहे. केवळ सचिनच नाही, तर अनेक भारतीय खेळाडूंना त्यांच्या या वागण्याचा अनेकदा त्रास सोसावा लागला आहे. अनेकदा भारतीय गोलंदाज गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी फलंदाज पायचीत असल्याच बकनर हे त्याला बादच ठरवत नसत. असे वागून बकनर आपला जुना सूड उगवत असल्याचा संशय त्यावेळी व्यक्त करण्यात येत होता. कालांतराने बकनर निवृत्त झाल्यानंतर ही बाब पुसट होत गेली खरी. मात्र, सचिनबाबतीत आपण चुकीचे वागल्याची कबुली स्वतःहूनच देत बकनर यांनी पुन्हा स्वतःलाच संशयाच्या पिंजर्‍यात उभे केले. हे स्पष्टीकरण देतानाही बकनर यांनी ब्रायन लारा हा सचिनपेक्षाही सर्वोत्तम फलंदाज होता, असे म्हणत पुन्हा एकदा मास्टर-ब्लास्टरला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बकनर यांची ही कबुली म्हणजे बनवाबनवीच असल्याचा संशय पुन्हा एकदा व्यक्त करण्यात येत आहे.

- रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@