कोरोनाचा कहर (भाग-१४) - जेल्सेमियम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jun-2020
Total Views |

Gelsemium_1  H



रुग्णांच्या लक्षणांचा व त्यावरील औषधांचा रिसर्च करताना होमियोपॅथीमधील काही औषधांंचा सफल उपयोग होत आहे. आज आपण त्यापैकीच एका औषधाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत आणि ते औषध म्हणजे (Gelsemium) ‘जेल्सेमियम’


कोरोना व्हायरसच्या या मोठ्या साथीच्या आजारात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होते आहे. तसे होमियोपॅथीच्या उपचारासाठीही तापाचे रुग्ण वाढू लागले आहेत आणि सुदैवाने होमियोपॅथीच्या उपचाराने हे रुग्ण लवकर बरेदेखील होत आहेत. या रुग्णांच्या लक्षणांचा व त्यावरील औषधांचा रिसर्च करताना होमियोपॅथीमधील काही औषधांंचा सफल उपयोग होत आहे. आज आपण त्यापैकीच एका औषधाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत आणि ते औषध म्हणजे (Gelsemium) ‘जेल्सेमियम’ या औषधाचा मुख्य प्रभाव हा स्नायू आणि मेंदूच्या नसा, मोटर न्यूरॉन्सवर असतो. या औषधाची मुख्य लक्षणे म्हणजे शारीरिक मंदपणा, चक्कर येणे, गुंगी येणे, डोळ्यांच्या पापण्यांचे जडत्व व अशक्तपणा. रुग्णाला फार अशक्तपणा असतो, शरीरांचे स्नायू अशक्त होतात, हातापायाचे स्नायू जड होऊन थकून जातात. मोटर न्यूरॉन्सवर प्रभाव असल्यामुळे एखाद्या अवयवाचा अशक्तपणा किंवा अर्धांगवायु होतो. जसे डोळ्याचा अर्धांगवायु, त्याचप्रमाणे घसा, स्वरयंत्र, गुदद्वार, मूत्राशयाचा अर्धांगवायु होतो. रुग्णाला सतत पडून राहावे, असे वाटू लागते. सतत कशाचा तरी व कोणाचा तरी आधार लागतो. शरीर कंप पावते, सतत लघवीला जावे लागते. साधारणपणे भय, भीती, नैराश्यजनक भावनिक वातावरण, वाईट बातमी, अतिराग यांच्यामुळे रुग्णाला लक्षणे दिसू लागतात. तापानंतरचे शरीरावरील परिणाम बरेच दिवसांपर्यंत कायम राहतात.



साधारणपणे खालील गोष्टींमुळे रुग्णाला त्रास होतो. जसे- भावनिक प्रसंग, मानसिक धक्का, हालचाल केल्याने त्रास होतो, तसेच दमट हवामान, वसंत ऋतू, धुक्याचे वातावरण, सूर्यप्रकाशाने होणारी गरमी यांनीसुद्धा रुग्णाला त्रास होतो. तसेच तंबाखू, थंड व दमट हवा हेसुद्धा सहन होत नाही. आजाराबद्दल सतत विचार करूनही रुग्णाला सतत त्रास होतो. खालील गोष्टींमुळे रुग्णाला आराम वाटतो. जसे- बर्‍याच तक्रारी भरपूर लघवी विसर्जित केल्याने कमी होतात. उदा. डोकेदुखी भरपूर लघवी झाल्यानंतर थांबते. घाम आल्यावर रुग्णाला बरे वाटते. मानसिक लक्षणांमध्ये जर आपण पाहिले तर रुग्ण फार घाबरतो. त्याला सतत आधाराची, मानसिक आधाराची गरज असते. उंचीची भीती, मृत्यूचे वाटणारे भय हीसुद्धा महत्त्वाची लक्षणे आहेत. नवीन काम करण्याआधी किंवा परीक्षेची अतिशय भीती वाटते व त्यामुळे आजारी पडणे हेदेखील फार महत्त्वाचे मानसिक लक्षण आहे. मानसिक धक्क्याचा होणारा त्रास व त्यावर कुढत बसण्याची वृत्ती, लहान मूल सतत घाबरते. सारखे आईला किंवा जवळच्या माणसास बिलगते.



तापाच्या लक्षणांमध्ये रुग्णाला सर्वप्रथम थंडी वाजू लागते व हुडहुडी भरते. अंग मोडून येते व दुखू लागते. शरीरातील मागील बाजूस म्हणजेच पाठीच्या भागात व मणक्यामध्ये थंडपणा व थंडी जाणवते. हातपाय थंड पडतात. तापामध्ये अंग तापण्याच्या वेळेस खूप ग्लानी येते. रुग्णाचे डोळेच उघडत नाही. जडत्व येते. रुग्णाला तापात अजिबात तहान लागत नाही. हातापायाला कंप सुटतो. घाम आला की शरीर गार पडते. ‘जेल्सेमियम’ हे औषध पित्तकारक लक्षणांमध्ये, तसेच मलेरिया, टायफॉईड किंवा मेंदूज्वरामध्येसुद्धा अतिशय उपयुक्त असल्याचा माझा अनुभव आहे. तापामध्ये अशक्तपणा व ग्लानीमुळे रुग्णाला चक्करही येते. सतत डोके दुखत राहते. डोळे जड होतात, दुहेरी दिसते. (Double Vision) जीभ जड होते. ग्लानीत असल्याप्रमाणे बोलण्यात जडत्व येते. जिभेवर घट्ट पिवळा थर जमा होतो. हा पित्ताचा थर असतो. अशा प्रकारची चिन्हे व लक्षणे जर रुग्णामध्ये आढळली तर ‘जेल्सेमियम’ हे औषध त्या आजाराला बरे करते. ‘कोविड-१९ ’च्या साथीमध्येसुद्धा अनेक रुग्ण या औषधाच्या वापराने तापातून मुक्त झाले आहेत. पुढील भागात आपण ‘कोविड-१९ ’च्या साथीच्या अनुषंगाने औषधांचा अभ्यास करणार आहोत.


- मंदार पाटकर
(लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@