सुशांतसिंगच्या जाण्याने नाराज मैथिली ठाकूरने उचलले मोठे पाऊल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2020
Total Views |

mathili thkaur_1 &nb




नवी दिल्ली : 
सुशांतसिंग राजपूतचे निधन अनेक कलाकार आणि चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेले. १४ जून रोजी सुशांतसिंग या जगाचा निरोप घेऊन गेला. त्याने वांद्रेच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, त्यांच्या निधनाच्या बातमीने दुखावलेल्या मैथिली ठाकूरने एक मोठे पाऊल उचलले आहे. तिने बॉलिवूडमधील कव्हर सॉंग्स गाण्यास नकार दिला आहे.




मैथिलीने ऋषभ ठाकुरच्या यूट्यूब वाहिनीवरून याचा खुलासा केला. या दोघांनी मिळून या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून बॉलिवूडमधील अनेक गाण्यांवर कव्हर गाणी गायली आहेत. मात्र, आता त्याच्या चाहत्यांना अशी गाणी ऐकायला मिळणार नाहीत. ही माहिती देण्यासंदर्भात एक व्हिडीओ मैथिलीने १६ जून अपलोड केला. याशिवाय अलीकडेच मैथिलीने आपल्या फेसबुक लाइव्हमध्येही याबद्दल बोलले आहे.



मैथिलीने तिच्या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले,'आम्ही या चॅनेलवर बॉलिवूड गाण्यांना कव्हर करण्यास सुरवात केली. यानंतर मिळालेला प्रतिसाद खूप चांगला होता. गेल्या एका वर्षात, चॅनेलने १.५ दशलक्ष प्रेक्षकांची संख्या ओलांडली आहे. पण आतापासून आम्ही कव्हर करत असणारी बॉलिवूडची गाणी थांबवत आहोत. मला याचे कारण माहित नाही. आतून एक फिलिंग आली. मी माझ्या वडिलांशीही चर्चा केली. मागील दोन दिवस बर्‍याच गोष्टीनी मनात काहूर माजविले आहे. आपण टीव्हीवर आणि सोशल मीडियावर सतत पहात आहोत. मी इन्स्टाग्रामवर देखील पाहिले तर अनेक गोष्टी समोर येत आहेत. खूप चुकीच्या गोष्टी घडत आहेत. यातील अशा काही गोष्टी आहेत ज्या आम्हीपण अनुभवल्या आहेत पण आम्ही त्या सोडून दिल्या...आम्हाला जे आवडेल ते आम्ही करू. जे आवडत नाही ते नाही करणार. मला आशा आहे की आपण स्वतंत्र कलाकार म्हणून आमचे समर्थन करत रहाल.' यापूर्वीही मैथिलीने तिच्या इस्टग्रामवर कंगना रनौतचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये कंगना राणावतने सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील अनेक गोष्टींवरून पडदा हटवला. हा व्हिडिओचे समर्थन करत मैथिलीने हा व्हिडिओ शेअर केला.
@@AUTHORINFO_V1@@