मी कटप्पा नको रे बाप्पा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2020   
Total Views |
Sanjay Raut_1  



चीनच्या आक्रमणाने बाहुबलीच्या राजकारणाची हवा निघाली. बाहुबली म्हणजे तुमच्या सगळ्या देशाचे लाडके नरेंद्र मोदी. हो हो त्यांची हवा निघाली, असे मी म्हणतो. काय म्हणता? यात भारत देशाचा नागरिक म्हणून मला चीनच्या आक्रमणापेक्षा बाहुबली आणि पर्यायाने देशावर संकट आहे, याचा विसर पडला. काय म्हणता ते बाहुबली तर मी कटप्पा... नका हो असे म्हणू. चित्रपटातल्या कटप्पाने बाहुबलीला कपटाने मारले. पण हा तुमचा खरोखरचा बाहुबली ‘नमो’ देश आणि समाजाचे नुकसान करणार्‍या सगळ्या मूर्ख कट्टप्पांना बासणात गुंडाळेल. नुकतेच आमचे साहेब म्हणाले की, ते पंतप्रधान बनवणार आहेत. मीच तो, मला पाहूनच साहेबांनी पंतप्रधान व्हायचे, माफी मागतो पंतप्रधान व्हायचे नाही, पंतप्रधान करायचे स्वप्न पाहिले. परिणामी राष्ट्रीय प्रश्नातले मला फारच कळते, असे सोंग मला करावे लागते. त्यामुळे महानगरपालिका, कोरोनाचा हाहाकार, निष्पाप लोकांचे हकनाक जाणारे बळी, मुंबईची होणारी दैना या फालतू विषयांवर बोलायला मी काय आता मुंबई किवा राज्याचा नेता नाही. जरा बडा सोचो! मी आता राष्ट्रीय नेता बनणार. कोरोनाच्या मनातले जाणणारे साहेब माझ्या मनातली इच्छा जाणतीलच. परप्रांतीय औरंगजेब्या पाप्याची दिल्ली. त्या दिल्लीमध्ये मी कैक वर्षे खासदारकीची सुलतानी गाजवत आहे. तसेही चीन, पाकिस्तान, आशिया खंड, अख्ख्या जगातले मला सगळे समजते. त्यामुळे मला महाराष्ट्रात, मुंबईत काय चालले आहे, हे माहिती करून घ्यायची आवश्यकता नाही. आता मी केवळ आणि केवळ ‘रोखठोक रडणार...’ सॉरीऽऽ ‘ओरडणार.’ पंतप्रधानकीच्या स्वप्नांखातर मला राष्ट्रीय मुद्दे उचलायलाच हवेत. त्यासाठी सध्या तरी मला काय डोके चालवावे लागत नाही. दिल्लीच्या मॅडम, त्यांचे राजकुमार म्हणजे आपलेही आताचे मोठे राजकुमार जे म्हणतील त्यावर ‘मम’ म्हणायचे. ते जे बोलतील तेच बोलायचे. त्याला काय डोके लागते. त्या तख्ताला मोदी नापसंत आहेत. मग आम्हाला चॉईसचा प्रश्नच नाही. जो उनको पसंद हो, वही बात करेंगे. त्यापलीकडे सगळे झूठ आहे. त्यापलीकडे मला माहिती नाही. मला इतकेच शिकवले आहे. नाही नाही मला इतकेच बोलायचा हक्क आहे. कारण, आम्हाला पंतप्रधान बनवायचा आहे.

दलवाई विवशता की विकृती?


देशाच्या शूर सैनिकांचे, नागरिकांचे मनोबल वाढवण्याऐवजी हुसेन दलवाई म्हणाले की, ‘चीनचा एकही सैनिक मारला गेला नाही.’ हे बोलून दलवाईंना काय साध्य करायचे आहे? हेच की चिनी सैनिक शूर आहेत. चीन समर्थ देश आहे. त्याच्यापुढे आपला देश आणि आपले सैनिक काही नाहीत? हे असे का? ते असेही म्हणाले की, रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांना काठी घेऊन सीमेवर पाठवा. तर दलवाईसारख्यांना हे सांगायची गरज नाही. ‘हम दिन चार रहे ना रहे, तेरा वैभव अमर रहे माँ...’ असा संकल्प असणारे संघाचे स्वयंसेवक वेळ आली तर सीमेवरही लढतील. दलवाईसारख्यांना कोण विचारतो? हुसेन दलवाईंसारखी व्यक्ती काहीबाही बरळतच असते. ते का मनावर घ्यायचे, असे वाटलेही. पण ‘म्हातारी मेली याचे दु:ख नसते तर काळ सोकावतोय’ याकडे लक्ष वेधायचे असते. त्यामुळे दलवाईंसारख्यांवरही मत व्यक्त करावे लागते. दलवाई यांनी नुकतेच एक वक्तव्य केले. अर्थात ते वक्तव्यच करतात. बाकी काही करत नाहीत म्हणा. त्यांचे म्हणणे असे की, सीमेवर काठ्या घेऊन रा. स्व. संघवाल्यांना पाठवा. का तर म्हणे सीमेवर सरकारने सैनिकांना नि:शस्त्र का पाठवले? काठ्या घेऊन का पाठवले? खरे म्हणजे दलवाई यांनी हा प्रश्न त्यांच्या सध्याच्या मालक कंपनीला विचारावा. दलवाईंनी जरा इतिहास पाहावा. वयाने तसे ज्येष्ठच आहेत. राजकारणात चांगला स्वार्थ साधतायत, म्हणजे तेवढी समजही असावीच त्यांना. सीमेवर सैनिक कसे आणि का गेले, याबाबत त्यांनी जरा अभ्यास करावा. आपल्या सैनिकांनी शत्रूशी लढता लढता हौतात्म्य पत्करले. या शूरांच्या आई-वडिलांनी आपल्या शुर बाळांचे हौतात्म्य तितक्याच शौर्याने स्वीकारले. सगळा देश या शूरांपुढे नतमस्तक आहे. आपल्या सैनिकांनीही चिनी सैनिकांना चांगलेच अस्मान दाखवले. पण दलवाई सांगत सुटले आहेत की, चीनचे नुकसान झाले नाही बरं का! त्यांचा एकही सैनिक मारला गेला नाही. चिनी सैनिकांबद्दल चांगले बोलावे लागणे, ही दलवाई यांची विवशता आहे की विकृती? दलवाई, जर डोळ्यातला आणि डोक्यातला विद्वेष, अज्ञान कमी केले तर वास्तव समजेल. सगळा देश चीनच्या विरोधात उभा आहे. बाकी तुमचेही बरोबरच आहे. रा. स्व. संघाबद्दल काहीबाही बोलले नाही तर तुमचे विद्वेषाचे दुकान कसे चालणार?








@@AUTHORINFO_V1@@