ऑनलाईन कार्यशाळेतून उलगडला 'नाट्यकलेचा प्रवास'

    21-Jun-2020
Total Views | 209

yogesh soman _1 &nbs



निराशाजनक व नकारात्मक वातावरणात कलाकारांचे मनोधैर्य राखणे गरजेचे : योगेश सोमण



भारतात कोरोनाची साथ आली आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी देशात लॉकडाऊन लावण्यात आले. याकाळात संसर्ग रोखण्यासाठी गर्दीचे ठिकाणं, शॉपिंग मॉल, नाट्यगृह आणि सिनेमागृहे, सर्व चित्रीकरण स्थळे देखील बंद करण्यात आली. यामुळे याकाळात अनेक कलाकार घरीच आपला वेळ घालवत आहे. याकाळात नवोदित नाट्यकलाकर व विद्यार्थ्यांची या कलाकारांची मानसिकता सकारात्मक ठेवत नाट्यकला अभ्यासपूर्ण मार्गाने कळावे यासाठी अभिनेते, दिग्दर्शक व लेखक योगेश सोमण यांनी 'ऑनलाइन नाट्य कार्यशाळा' सुरू केली. या नाट्यकार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे एका ठराविक काळासाठी ही कार्यशाळा मर्यादित न ठेवता लॉकडाऊन सुरु झाल्यापासून एकही दिवस खंड न पडता आजतागायत या कार्यशाळांचे वर्ग सुरु आहेत.




online workshop_1 &n



या कार्यशाळेत आजपर्यंत अनेक कलाकार व नाट्यरसिक ज्यांना या नाटक,सिनेमा ,दिग्दर्शन व लेखन यामध्ये रस आहे अशा ३०जणांनी सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे ही कार्यशाळेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आले नव्हते. खरंतर विद्यार्थी व नाट्यरसिक ज्यांना पडद्यामागील गोष्टी जाणून घेण्याची इच्छा होती त्यांच्यासाठी ही कार्यशाळा एक वेगळीच पर्वणीच ठरली. या कार्यशाळेत सोमण यांनी रंगमंचावर वावरणाऱ्या व्यक्तीने एक कलाकार म्हणून कसं घडत जावं आणि कलाकारांमध्ये कोणती कौशल्ये असावीत यावर भर देण्यात आला. ही ऑनलाईन कार्यशाळा सकाळी ९ ते दुपारी १ अशा एकूण ४ सत्रांत होतं. योगसाधना, व्यायाम, नाट्यशास्त्र, वाचिक अभिनय, दिग्दर्शन, चित्रपटांचा इतिहास,संगीतशास्त्र हे विषय या ऑनलाईन कार्यशाळेत त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली शिकविण्यात आले.




online workshop_1 &n


याकार्यशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर भर देण्यात आला. या कार्यशाळेत 'स्वरसाधना' संगीत विषयक अभ्यासक्रम सायली सांभारे आणि अक्षय देशपांडे यांनी शिकविला. यामध्ये कलाकाराला त्याचा आवाज अधिक श्राव्य करण्यावर भर देण्यात आला. संगीतातील सुरांचे महत्व अभ्यास पूर्ण समजावून देत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर रश्मी देव यांनी 'भरत मुनींचे नाट्यशास्त्र' हा विषय शिकविला. 'संस्कृत श्लोक' आणि 'संस्कृत भाषा', 'रससिद्धांत', 'सभागृह' व यातून अभिनय कलेचा कशी विकसित होत गेली त्यातून झालेला 'नाट्यशास्त्रा'चा उगम या सगळ्याची इतंभूत माहिती त्यांनी या ऑनलाइन कार्यशाळच्या माध्यमातून विद्यार्थांना दिली. यामध्ये विशेष आकर्षण ठरली ती योगेश सोमण यांनी घेतलेली लेखन कार्यशाळा. याकार्यशाळेत लेखन कौशल्यातील विविध पैलू व त्याअनुषंगाने नाट्यलेखन याचे मार्गदर्शन केले . तसेच 'संवादलेखन','स्वगत','नाट्यछटा','एकपात्री प्रयोग', 'श्रुतिका' यांसारख्या नाट्यप्रकारांचे लेखन याविषयी मार्गदर्शन केले. तसेच कथेवरून नाट्यरूपांतर करण्याबाबत माहिती दिली.



online workshop_1 &n


सोमण यांनी सुरू केलेल्या या ऑनलाइन कार्यशाळेत चित्रपट व नाट्यसृष्टीतील अनेक नामांकित कलाकार मंडळीनी सुद्धा मार्गदर्शन केले. अभिनेते विजय पटवर्धन, कमलेश सावंत यांनी 'चित्रपट क्षेत्रातील संधी'ची माहिती दिली. त्यांचे अनुभव सांगितले तसेच नवोदित कलाकारांना भविष्यात कोणत्या प्रसंगांना सामोरं जावं लागेल आणि त्यासाठी या कलाकानी स्वतःला कसं घडवावं या आव्हानांचा कसा सामना करावा याबाबत माहिती दिली. नाट्यसृष्टीतील एकपात्री प्रयोग करणाऱ्या मराठीतील नामांकित नाव 'सुषमा देशपांडे' यांनी एकपात्री या नाट्यप्रयोगांविषयी या कार्यशाळेत माहिती दिली. केवळ अभिनय किंवा लेखनच नव्हे तर शारीरिक स्वास्थ राखण्यासाठी दैनंदिन जीवनात 'योगाभ्यास' या विषयाचे मार्गदर्शन श्रीकांत भिडे यांनी केले. हे एक व्यावसायिक कलाकार सुद्धा आहेत त्याचबरोबर त्यांचा 'योगा आणि फिजिकल थिएटर' या विषयात ते पारंगत आहेत. यांनी विद्यार्थ्यांना व्यायाम प्रकार शिकवले. तसेच मोनिका ठक्कर यांनी 'लोककला आणि अभिनय' या विषयाचे मार्गदर्शन केले. दिग्दर्शक अभिनेता सलीम आरिफ यांनी देखील या ऑनलाइन कार्यशाळेमध्ये दिग्दर्शन कसे करावे याचे धडे दिले. दिग्दर्शन करताना कलाकार आणि दिग्दर्शक यांच्यातील समन्वयाचे महत्व पटवून देत प्रात्यक्षिकासह दिग्दर्शन याविषयीचे मार्गदर्शन केले. योगेश सोमण यांनी या ऑनलाइन कार्यशाळेमार्फत नवोदित कलाकार व विद्यार्थीवर्गाला लॉकडाउनच्या या कठीण प्रसंगात निराश किंवा नकारात्मकतेकडे झुकू न देता योग्य मार्गदर्शन करत त्यांची सकारात्मक विचारप्रणली जागरूक ठेवली.

  
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121