चार दिवसात कोरोनामुक्त? ‘या’ देशाने केला दावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jun-2020
Total Views |

vaccine_1  H x
 
नवी दिल्ली : सध्या कोरोनामुळे संपूर्ण जग त्रस्त आहे. काहींनी अद्याप देशांमधील लॉकडाऊन उठवलेले नाहीत. तर काहींनी याच्या सोबतच जगण्याचा पर्याय निवडला आहे. आत्तापर्यंत ठोस असा उपाय कोरोनावर मिळू शकलेला नाही. मात्र, कोरोनावर मात करणारे औषध विकसित केल्याचा दावा रशिया करत आहे. रशियामध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर या औषधाचा पुढच्या आठवडयापासून वापर सुरु होणार आहे. हे औषध वापरण्यास रशियाच्या आरोग्य यंत्रणेने मंजुरी दिली असून यासंदर्भातील वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
 
 
आरोग्य यंत्रणेवरील ताण या नव्या औषधामुळे कमी होण्याची शक्यता असून त्याचबरोबर विस्कटलेली आर्थिक घडी रुळावर येऊन जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे. औषधाची ‘एविफेविर’ या नावाने नोंदणी झाली आहे. रशियन रुग्णालयांमध्ये याच महिन्याच्या ११ तारखेपासून कोरोना रुग्णांवर या कोरोना प्रतिबंधित औषधाने उपचार सुरु होणार आहेत. यासंदर्भातील माहिती रशियाच्या ‘आरडीआयएफ’ प्रमुखाने रॉयटर्सला दिली आहे. महिन्याला ६० हजार रुग्णांवर उपचार करता येतील, इतक्या प्रमाणात एविफेविर औषध बनवणारी कंपनी औषध बनवणार आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@