एका दहशतवाद्याला कंठस्नान ; चकमक सुरूच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jun-2020
Total Views |

indian army_1  
 
 
नवी दिल्ली : एकीकडे संपूर्ण देश हा कोरोनाशी लढा देत असताना दुसरीकडे भारतीय जवान दहशतवाद्यांशी लढत आहेत. जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश प्राप्त झाले. सुरक्षा दलाने अवंतीपोरा त्रालच्या सिमोह परिसराला वेढले आहे. तिथे आणखी काही दहशतवादी लपून बसले असून जवान आणि दहशवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराची टीम आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने शोध मोहीम सुरू केली होती. या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा कर्मचारी आणि दहशतवादी यांच्यात चकमकीला सुरुवात झाली. सुरक्षा दलाने संशयास्पद जागेला घेराव घातला असून या भागात शोध मोहीम सुरु केली आहे. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. यापूर्वीही पाकिस्तानी सैन्याने शनिवारी सकाळापासून रविवार सकाळ पर्यंत सीमेवरील चौक्यांसह रहिवासी भागांना लक्ष करत गोळीबार केला होता.
 
 
कीरनी पासून बालाकोटपर्यंत शंभर किलोमीटर पेक्षा जास्त लांब नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून कुरपाती करणे सुरूच आहे. पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या गोळीबारात मेंढर सेक्टरमध्ये काही जनावरं देखील जखमी झाले तर घरांचेही नुकसान झाले आहे. तर, दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याकडूनही सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात येणाऱ्या गोळीबारास भारतीय जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले. ज्यामध्ये सहा पाकिस्तानी सैनिक गंभीर जखमी झाले, शिवाय त्यांच्या काही चौक्या देखील उद्धवस्त झाल्या आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@