...अन् भोपाळ गॅसगळतीची पुनरावृत्ती टळली!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jun-2020   
Total Views |

vishakhapattanam_1 &



दि. ७ मे रोजी विशाखापट्टणमधील प्लांटमध्ये झालेल्या स्टायरिन गॅसगळतीचा अहवाल नुकताच समोर आला आहे. या चौकशी अहवालातून द. कोरियन कंपनीचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे. तेव्हा, भीषण भोपाळ गॅसगळतीसारख्या अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे.



विशाखापट्टणमच्या दक्षिण कोरियन एलजी केम पॉलिमर प्लांटमधील एका २४००टन गॅसच्या टाकीमधून स्टायरिन गॅसची गळती होऊन ७मेच्या पहाटे अडीच वाजता विषारी गॅस दूरवर पसरला आणि त्यामुळे हजारांहून जास्त माणसे बाधित झाली. त्यातले १२जण गुदमरून मृत्युमुखी पडले व इतर बाधितांना वेळीच हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता पाठविल्यामुळे त्यांचे जीव वाचले. तरीही तब्बल ५०० नागरिक अद्यापही नाजूक अवस्थेत आहेत. या स्टायरिन गॅसच्या फ्यूम प्रसरणाने तीन किमी परिसर व्यापून गेला होता. त्यात आर आर वेंकटापूरम, पद्मापूरम, बीसी कॉलनी, गोपालपट्टणम आणि कंपारापालेम ही पाच गावे प्रामुख्याने जास्ती बाधित होती. हजारो जण श्वास कोंडल्यामुळे व डोळ्यांच्या प्रचंड जळजळीने त्रस्त होते, तर अनेकांची शुद्ध हरपली. स्टायरिन गॅस शरीरातील मध्यवर्ती मज्जातंतू प्रणाली बिघडविते, तसेच घसा, त्वचा, डोळे आणि इतर अनेक अवयवांवरसुद्धा विपरीत परिणाम करते. हा स्टायरिन गॅस प्लास्टिक वस्तू बनविण्याकरिता विशाखापट्टणम प्लांटध्ये वापरला जात होता. खाण्याचे जिन्नस पॅक करण्याकरिता, इन्सुलेशन, फायबरग्लास, पाईप, ऑटो पार्ट्स इत्यादीसाठी प्लास्टिक बनविण्याकरिता स्टायरिन गॅसचा प्रामुख्याने वापर केला जातो.


‘एनडीआरएफ’चे पथक घटनास्थळी संकटाचे निवारण करण्यासाठी ताबडतोब पोहोचले. त्या संस्थेचे मुख्य संचालक एस. एन. प्रधान यांचे म्हणणे होते की, “स्टायरिन गॅस हा मोठ्या प्रमाणात ज्वालाग्राही आहे व तो पेटल्यावर त्यातून विषारी रसायने बाहेर पडतात. हा गॅस श्वासावाटे शरीरात गेला, तर त्या व्यक्तीला लगेच भोवळ येते. या गॅसमुळे बाधित झालेल्यांना ताबडतोब वैद्यकीय उपचार घेणे बंधनकारक आहे.” घटनास्थळी अपघातानंतर फोटो घेतले, तेव्हा काही गोष्टींचा उलगडा झाला. मोठे शास्त्रज्ञ व नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे संस्थेच्या माजी संचालकांनी या अपघाताविषयी काही तांत्रिक गोष्टींचा नुकताच खुलासा केला आहे. २४००टन क्षमतेच्या टाकीत १८००टन स्टायरिन गॅस भरला होता. टाकीचे काही व्हॉल्व्हज व्यवस्थित हॅण्डल केले गेले नव्हते. टाकी थंड करण्याच्या मशीनमध्ये पण बिघाड झाला होता.



स्टायरिन गॅस म्हणजे काय?

हा गॅस म्हणजे एक बिनरंगाचे द्रावण आहे. स्टायरिन रसायन गॅसच्या स्थितीत कधीच स्थिर नसते. हे स्टायरिन रसायन एका रेणूच्या अस्थिर अवस्थेत असते आणि विशेषत: जेव्हा त्याचे तापमान ६५अंश वा अधिक असते. तेव्हा त्याचा कल आपोआप अनेक रेणू बनण्याच्या लांब साखळ्यांमध्ये रुपांतर करण्याकडे (polymerisation) असतो. त्यावेळी या रसायनाची अनेक रेणू बनण्याची स्वाभाविक कृती असते व मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर फेकण्याची पण प्रवृत्ती असते, त्याला (exothermic) म्हणतात. ही प्रवृत्ती अनिर्बंधित असते. म्हणूनच स्टायरिन रसायन कोठेही साठा करताना नेहमी कमी तापमानात (१५अंश ते २०अंश सेल्सिअस) ठेवलेले असते. कारण, चुकून माकून त्याचे अनेक रेणूंमध्ये रुपांतर न होणे व जास्त उष्णता बाहेर येऊ न देणे हे उद्दिष्ट साधायचे असते. या साठा केलेल्या स्टायरिन रसायनात ‘पॉलिमरायझेशन’ होऊ नये, याकरिता दुसरे एक पॅराटर्शरी ब्युटिल कॅटेहॉल (TBC) नावाचे इन्हिबिटर रसायन टाकलेले असते. इतके करूनही जेव्हा बाहेरचे तापमान जास्त असते, तेव्हा इन्हिबिटर द्रावण स्थितीत जाते व आपोआप स्टायरिनचे टाकीच्या टपावर, भिंतीवर व वातावरणात गॅस वा फ्यूममध्ये प्रसरण होते आणि स्टायरिनची अनिर्बंधित स्थिती ‘पॉलिमरायझेशन’ होण्यात होते व अनेक व्हॉल्व्हज निकामी ठरतात.
या विझाग गॅसगळतीने 1984 मधील भोपाळ गॅसगळतीची आठवण येते. परंतु, या दोन्ही घटनांच्या तुलनेत भोपाळ गॅसची घटना ही अनेक प्रकारांनी जास्त भयानक होती. भोपाळ गॅसच्या गळतीत मिथेल आयसोसायनेट (MIC) होते, तर विशाखापट्टणमच्या गॅसगळतीत स्टायरिन गॅस होता. हवेच्या एक दशलक्ष भागात जरी दोन ते पाच भाग एमआयसी असले, तरी ते विनाशकारी ठरू शकते आणि भोपाळमध्ये अपघाताची घटना घडली, तेव्हा हवेत तब्बल २१विषारी भाग होते. यााउलट स्टायरिन गॅसच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, एक दशलक्ष भागात स्टायरिन गॅसचे ७००भाग मिसळले गेले की ते विनाशकारी ठरते. ‘एमआयसी’ची गळती ही हायड्रोजन सायनाईडइतकीच भयानक असते. कारण, त्यातून रक्तातील हिमोग्लोबिन नष्ट होते. भोपाळ वायुगळतीच्या भीषण अपघातात तब्बल तीन हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आणि पाच लाखांहून अधिक नागरिक बाधित झाले. पण, कंपन्यांनी थोडी जास्त खबरदारी घेतली असती, तर निश्चितच या दोन्ही गॅसगळतीच्या घटना घडल्या नसत्या. त्यात देशाचे दुर्देव म्हणजे, भोपाळ वायुगळतीला जबाबदार असलेल्या दोषी युनियन कार्बाईडच्या मुख्य संचालकांना काँग्रेसने देशाबाहेर पळून जाण्यास मदत केली.
गॅसगळतीचा शोध व विनाशकारी रसायने हटविण्याची मोहीम

केंद्र सरकारने काही तज्ज्ञांना विशाखापट्टणमच्या अपघातस्थळाची तपासणी करण्यासाठी पाचारण केले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, बाकीच्याही टाक्यांची तपासणी करणे फार महत्त्वाचे होते. कारण, त्या टाक्यांच्या सुरक्षिततेची खबरदारी कंपनीने घेतली आहे का, ते तपासणे गरजेचे होते, नाहीतर त्या टाक्यांमध्येदेखील गॅसगळती पुढील काही दिवसांत झाली असती. त्यांच्या तपासणीच्या काळामध्ये ‘पॉलिमरायझेशन’ व मोठे फ्यूम बनण्याच्या स्थितीत एक टाकी त्यांना सापडली आणि त्या टाकीतील धोकादायक रसायने हटविण्यात आली. या तपासणीसाठी दोन तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली होती व ते दोघेही राष्ट्रीय आपत्काल व्यवस्थापन प्राधिकरणातील उत्तम ज्ञानी होते. एक तर इंडियन इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. अंजन रे व दुसरे उद्योगविश्वातील तज्ज्ञ शंतनू गीते. डॉ. रे हे स्टायरिन गॅसचे तज्ज्ञ मानले जातात. त्यांनी सल्ला दिला की, प्लांटमधील साठ्यामधील सर्व सामग्रीमाल दुसरीकडे ताबडतोब हलविला गेला पाहिजे. त्यांच्या सल्ल्यानुसार कंपनी आणि राज्य सरकारने १३ हजार मे. टन सामग्रीमाल देशाबाहेर पाठवून द्यायची ताबडतोब व्यवस्था केली. ११ मे रोजी राज्य सरकारने शिपिंग खात्याच्या मदतीने दोन जहाजांमधून आठ हजार मे. टन व पाच हजार मे. टन माल कंपनीच्या द. कोरियातील सेऊल येथील मुख्य गोदामात पाठवून दिला.

विझागच्या अपघातात कंपनीकडून दुर्लक्ष झाले का?


राष्ट्रीय हरित लवादाने सेवानिवृत्त न्यायाधीश बी. सेशसायना रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमून या अपघाताची रीतसर चौकशी केली. तेव्हा त्यांनी दक्षिण कोरियन कंपनीने अनेक दुर्लक्षित केलेल्या कृतींकडे लक्ष वेधले. चौकशीचा अहवाल २८ मे रोजी समोर आला. चुकूनमाकून स्टायरिन गॅसचे ‘पॉलिमरायझेशन’चे काम सुरू राहिले तरी मशीन कामगारांना पुरेसा वेळ वा अलर्ट मिळू शकले असते. कारण, गॅसचे तापमान वाढण्याची क्रिया फार सावकाश होत असते. इन्हिबिटरशिवाय २०अंशातून ३० अंशापर्यंत तापमानवाढीला २५दिवस लागतात. याचाच अर्थ विशिष्ट काळानंतर सुरक्षिततेची तपासणी केली असती, तरी चालण्यासारखे होते. पण, ते कंपनीने केलेले दिसत नाही.

चौकशी अहवालातून समोर आलेले प्रमुख मुद्दे
इन्हिबिटर टीबीसीचा माल कमी पडला. १ एप्रिलपासून हा माल वापरला गेला नव्हता. रोज संध्याकाळी रेफ्रिजरेशन प्रणाली बंद केली जायची. ज्या ‘एम ६’ टाकीमुळे अपघात घडला, त्याच्या वरच्या व मधल्या भागात तापमान सेन्सर नव्हते, त्यामुळे टाकीत तापमान वाढले आहे, हे कळण्याचा कोणताही मार्ग नव्हता. फक्त तळाशी तापमान सेन्सर व रेफ्रिजरेशन प्रणाली लावलेली होती. कंपनीकडे अनुभवी व प्रशिक्षित नोकरवर्गाचा तुटवडा असल्याचेही या चौकशी अहवालातून समोर आले. तसेच सीसीटीव्हीच्या मदतीने ८०० स्टायरिन गॅस गळतीचा अपघात पहाटे अडीच वाजल्यापसून सुरु झाला, पण लोकांना अपघाताची बातमी टन कळण्यासाठी फॅक्टरीमध्ये ऑटोमॅटिक अलार्म वा पब्लिक सायरन प्रणालीच मुळात नव्हती आणि जो सायरन होतो, तो ऑटोमेटिक नसून कर्मचार्‍यांनी चालू करणे अपेक्षित होते. त्याचबरोबर तापमान वाढण्याची व रेफ्रिजरेशन प्रणाली आपोआप चालू होण्याची रचना नसल्याने टाकीतल्या उष्णतेवर नियंत्रण ठेवता आले नाही. इतकेच नव्हे तर त्याठिकाणी पाण्याचा फवारा मारण्याची व्यवस्था नव्हती किंवा ऑटोफायर स्प्रिन्कलरचीही सोय नव्हती. त्यामुळे कंपनीचे मुख्य संचालक, सुरक्षा विभाग व अधिकारी, उत्पादन विभाग इत्यादी सर्वजण या गॅसगळतीसाठी दोषपात्र आहेत.

या दक्षिण कोरियन कंपनीने जगात अनेक ठिकाणी स्टायरिन गॅसचे काम गेले आहे. आतापर्यंतच्या अधिकृत माहितीप्रमाणे, विशाखापट्टणमला ७ मे रोजी घडलेल्या अपघातासारखा अपघात काही लहान-सहान दुसरे अपघात सोडले, तर अन्यत्र कोठेच घडलेले नाहीत. असाच एक मोठा अपघात म्हणजे, गेल्या वर्षी एका दक्षिण कोरियन बंदरावर शिपिंग टँकरचा स्फोट झाला होता. भारतातील पॉलिमर उद्योगात असा स्टायरिन गॅसचा अपघात घडलेला नाही. भारत दरवर्षी सुमारे १.५ मिलियन मेट्रिक टन स्टायरिन गॅस आयात करतो व तो स्टायरिन गॅस अनेक ठिकाणी उत्पादनाच्या कामासाठी दैनंदिन वापरलाही जातो. यावरून हाच निष्कर्ष निघतो की, दक्षिण कोरियन कंपनीवर अपघाताचा ठपका ठेवणे योग्य ठरेल. सरकार यात दोषी आढळत नाही. दोष असेल तो एवढाच की, या दक्षिण कोरियन कंपनीला या प्लांटवर नेमण्यापूर्वी योग्य ते सर्व खबरदारीच्या उपाययोजना कार्यान्वित आहेत अथवा नाही, याची तपासणी होणे आवश्यक होते.
@@AUTHORINFO_V1@@