राज्यसभेच्या १९ जागांसाठी मतदान सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2020
Total Views |

rajyasbha_1  H




नवी दिल्ली :
देशातील ८ राज्याच्या राज्यसभेच्या १९ जागांसाठी आज निवडणूक होणार आहे. मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये ही लढाई होणार आहे. यापूर्वी कोरोनाच्या संकटामुळे १८ जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर या निवडणुका पार पडत आहे.



राज्यसभेच्या १९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये प्रत्येकी ४, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी ३ , झारखंडमध्ये २ आणि मणीपूर, मिझोरम व मेघालय येथील प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होत आहे.  झारखंडमधील भाजप आमदार बिरांची नारायण म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीत दोन अपक्ष आमदार सरयू राय आणि अमित यादव यांनी भाजपला पाठिंबा दर्शविला असून आम्हाला अन्य दोन आमदारांचा पाठिंबा मिळेल अशी आशा आहे. ३२ मतांनी, दीपक प्रकाश राज्यसभेवर जातील अशी आमची आशा आहे. तसेच गुजरातमधील चारपैकी दोन जागांवर भाजपाचा विजय आणि एकामध्ये कॉंग्रेसचा विजय मानला जात आहे. एका जागेसाठी लढाई रंगू शकते.



त्याचबरोबर मध्य प्रदेशच्या तीनपैकी दोन जागांवर भाजपाचा विजय निश्चित झाल्याचे समजते. एक जागा कॉंग्रेसच्या खात्यात जाऊ शकते.तर राजस्थानमध्येही तीन जागांसाठी निवडणुका आहेत. कॉंग्रेसचा दोन आणि यातील एकावर भाजपचा विजय निश्चितच निश्चित आहे. कर्नाटकमधील ४ जागेवर माजी पंतप्रधान एचडी दैवेगौडा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, भाजपा उमेदवार इरन्ना काडादी आणि अशोक गस्ती हे यापूर्वीच बिनविरोध विजयी झाले आहेत. तर, अरुणाचल प्रदेशमध्येही भाजपा उमेदवार नबाम रेबिया यांनी बिनविरोध विजय मिळवत भाजपाची सीट काबिज केली आहे. आज सायंकाळीच या सर्व १९  जागांसाठी मतमोजणी होऊन विजयी व पराजीत जागांचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सोशल डिस्टन्सिंगचे पालन व प्रत्येक उमेदवार आणि मतदाराचे थर्मल स्क्रीनिंग करुनच मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने योग्य खबरदारी घेतली आहे.
@@AUTHORINFO_V1@@