अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाची शहीद भारतीय जवानांना श्रद्धांजली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2020
Total Views |

america_1  H x


वॉशिग्टन :
लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी सैन्याशी झालेल्या हिंसक चकमकीत मृत्यू झालेल्या भारतीय सैनिकांबद्दल अमेरिकेने गुरुवारी तीव्र शोक व्यक्त केला. सीमाभागात चीनने केलेल्या या भ्याड हल्ल्यात २० भारतीय जवानांचा मृत्यू झाला.





अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ, चीनच्या शीर्ष मुत्सद्दी यांग जीएची यांच्यासमवेत भेटीनंतर काही तासातच म्हणाले की, नुकत्याच चीनबरोबर झालेल्या हिंसक संघर्षात शहीद झालेल्या भारतीय जवानांप्रती शोक व्यक्त करतो. आम्ही भारतीय जवान, त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि भारतीय नागरिकांच्या दुःखात सहभागी आहोत.पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) भारत आणि चीनमधील हिंसक संघर्षाचा मुद्दा हवाईमध्ये पॉम्पीओ-यांग या चर्चेत आला की नाही याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने कोणतीही माहिती दिली नाही.व्हाईट हाऊसने यापूर्वीच सांगितले होते की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पूर्व लडाखमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमधील हिंसक चकमकीची माहिती आहे. पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री चीनी सैन्याशी झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाले.
@@AUTHORINFO_V1@@