ऑस्ट्रेलियावर मोठा सायबर हल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2020
Total Views |

cyber attack _1 &nbs



ऑस्ट्रेलिया :
ऑस्ट्रेलियामध्ये मोठा सायबर हल्ला झाला असून या हल्ल्यात सरकारी आणि खासगी क्षेत्रांना लक्ष्य केले आहे. वृत्तसंस्था एएफपीने दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला संघटित टोळीने किंवा त्याआडून एखादा देश असू शकतो याचा तपास घेतला जात आहे.


ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाच्या खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील संघटनांना लक्ष्य करुन कोणत्यातरी परदेशी संस्थेने हा मोठा सायबर हल्ला केला आहे. तसेच आम्हाला माहीत आहे की हे अत्यंत गुंतागुंतीचे आहे. हा सायबर हल्ला कोणत्या मार्गाने केला गेला आणि त्याचे लक्ष्य असलेल्या संस्थांवर आणि मोठ्या प्रमाणात होणारा परिणाम स्पष्ट आहे. ऑस्ट्रेलियन सरकार या सायबर हल्ल्यांच्या धोक्याबाबत सावध व सतर्क असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.




पंतप्रधान मॉरिसन म्हणाले की, ही नवीन जोखीम नाही, परंतु या हल्ल्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे यांनी काही विशिष्ट संघटनांना लक्ष्य केले. म्हणून सर्व ऑस्ट्रेलियन संघटनांना स्वत: च्या संरक्षणासाठी योग्य ती पावले उचलण्याचा आवश्यक सल्ला देण्यात आला आहे. ते म्हणाले की, आतापर्यंतच्या तपासात मोठ्या प्रमाणात वैयक्तिक डेटा चोरी झाल्याचे उघड झाले नाही. ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षा संस्था आपल्या सहयोगी संस्थासह एकत्रितपणे याचा तपास करीत आहेत. मॉरिसन म्हणाले की, या व इतर अनेक बाबींसंदर्भात काल ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांच्याशी मी बोललो आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून सतत माहिती घेत आहे. ते म्हणाले की, या मागे कोणता देश आहे हे सध्या आपण सांगू शकत नाही. सायबर हल्ल्यामागील चीनचा हात असल्याच्या प्रश्नावर पीएम मॉरिसन म्हणाले की, ऑस्ट्रेलियन सरकार या प्रकरणात कोणावरही आरोप करत नाही.
@@AUTHORINFO_V1@@