ठाकरे सरकारचा चीनी कंपनीशी ७६०० कोटींचा करार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2020
Total Views |
UT _1  H x W: 0



पुण्यात तळेगाव येथे उभा राहणार चीनी कंपनीचा प्लांट



मुंबई : भारत आणि चीन सीमारेषेवर सुरू असलेल्या तणावात राज्य सरकारने चीनी कंपनी जीडब्ल्यूएमशी एक अब्ज डॉलर म्हणजे ७ हजार ६०० कोटींहून अधिक किमतीचा करार केला आबहे. राज्य सरकारने आणखी एक चीनी कंपनी हेंगली इंजीनियरिंगशी अडीचशे कोटींचा करार केला आहे.


चीनची प्रमुख वाहन निर्माता कंपनी ग्रेट ग्रेट वॉल मोटार्स (जीडब्ल्यूएम) आणि राज्य सरकारतर्फे पुण्यातील तळेगाव येथे ३ हजार ७७० कोटींची गुंतवणूक करणार आहे. यानंतर ७ हजार ६०० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. अंतर्गत तीन हजार रोजगार उपलब्ध होण्याचा दावा केला जात आहे. 



जीडब्ल्यूएम एसयूवी वाहन निर्मिती करणारी कंपनी आहे. भारतात ही कंपनी लोकप्रिय आहे. या कंपनीने अमेरिकन वाहन कंपनी जनरल मोटर्सशी करार केला होता. तळेगाव येथील प्लांट अधिग्रहण करण्यासाठी एक करार करण्यात आला आहे. जीडब्ल्यूएमची भारतीय सहायक कंपनीचे संचालक पार्कर यांनी राज्य सरकारचे धन्यवाद मानले आहेत.  महाराष्ट्र उद्योग विभागातर्फे या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मॅग्नेटीक महाराष्ट्र-२ या कॉन्फरन्समध्ये अमेरिका, चीन, कोरीया, सिंगापूर या देशांचे १२ प्रतिनिधी सामाविष्ठ होते.










@@AUTHORINFO_V1@@