सर्व मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर्सला चिनी उपकरणे हटवण्याचे आदेश
नवी दिल्लीः भारत सरकारने चीनी दूरसंचार उपकरणांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर्सला चिनी उपकरणं हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जुने टेंडर रद्द करुन नवीन टेंडर जारी करा, ज्यात चीन कुठंही नसेल अशा प्रकारचे आदेश सरकारी दूरसंचार कंपन्यांना देखील दिले आहेत.
भारत सरकारने दूरसंचार विभाग, बीएसएनएल आणि एमटीएनएलला आदेश दे सरकारी ४जी यंत्रणेत चीनी उपकरणांचा वापर तात्काळ बंद करण्यास सांगितले आहे. दूरसंचार विभागात ४जी कार्यान्वीत करण्यास उपयोगात येणारी चीनी उपकरणे जी वापरात आहेत किंवा नाहीत, त्याचा वापर तात्काळ बंद करावा, असे सरकारने म्हटले आहे.
चीनला भारतीय बाजारातून हद्दपार करण्याची मोहीम देशभरात सुरु झाली आहे. देशभरात नागरिक देखील चिनी वस्तूंची होळी करताना दिसत आहेत. यातच सरकारने दूरसंचार क्षेत्रातील सरकारी आणि खासगी कंपन्यांना चिनी उपकरणं वापर-खरेदीवर बंदीचे आदेश दिले आहेत. नव्या शर्थींसह सरकारी टेंडरमधून चिनी कंपन्यांना बाहेर ठेवणार असल्याची माहिती आहे. इतर खाजगी मोबाईल कंपन्यांनाही चिनी उपकरण्याचा वापर कमी करण्यास सांगण्यात येणार आहे.