सेलिब्रिटींनी चीनी जाहिरातींवर बहिष्कार घालावा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2020
Total Views |
Oppo-Vivo_1  H




मुंबई : चीनी उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी करत असताना आता खेळाडू आणि कलाकारांनीही चीनी जाहिरातींवर बहिष्कार टाकावा, अशी मागणी त्यांच्या फॅन्सनी केली आहे. चीनविरोधात देशभरात संताप व्यक्त केला जात असताना अजूनही काही कलाकार आणि सेलिब्रिटींतर्फे चीनी मोबाईल कंपन्या आणि ब्रॅण्डसच्या जाहिराती करत आहेत.




अनेक सेलिब्रिटींनी दीर्घकाळासाठी करार केला आहे. त्यामुळे अशा कंपन्यांवर बहिष्कार घालून चीनी ब्रॅण्ड्सच्या जाहिराती नाकाराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ आल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) आता  सेलिब्रिटींनी अशा जाहिराती स्वीकारू नये, अशी आवाहन केले आहे. 


विराट कोहली, आमिर खान, रणविरसिंह यांच्यासह बॉलीवुडच्या अनेक कलाकारांचे विविध चीनी मोबाईल कंपन्यांच्या ब्रॅण्डशी करार झाले आहेत. चीनविरोधातील वातावरणामुळे अनेक मोबाईल विक्रेत्यांनी आपल्या दुकानांमध्ये चीनी मोबाईल उत्पादने विकणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. चीनी वस्तूंवर बहिष्काराच्या मोहिमेतून अनेकांनी आपल्या घरातील चीनी वस्तूंची होळी केली आहे. त्यामुळे सेलिब्रिटींनीही चीनी उत्पादनांवर बहिष्काराच्या या मोहिमेत सहभाग घ्यावा अशी मागणी होत आहे.



@@AUTHORINFO_V1@@