चीनी सैनिकांनी कट रचून केला हल्ला! तरीही केले ४० चीनी सैनिकांना गारद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2020
Total Views |
Ladakh _1  H x



नवी दिल्ली : भारताने चीनला बुद्ध दिला आणि चीनने देशाला युद्ध... वेळोवेळी आपल्या धोका देऊन पाठीमागून वार करणाऱ्या चीनने यावेळीही तीच योजना आखली. सोमवार दि. १५ जूनच्या रात्री टोकेरी शस्त्राने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने भारतीय सैनिकांना सावरण्यासाठी वेळही मिळाला नाही, याच कारणामुळे चीनी सैनिकांशी लढता लढता एकूण २० जवानांना वीरमरण आले. 



भारतीय सैन्याने केलेल्या प्रत्युत्तरात एकूण ४० सैनिकांना ठार केले. ११० हून अनेक जणांना उपचाराची गरज आहे. पूर्व लडाखच्या भागात चीनी सैन्यदलाने पुढे येत एक तात्पूरता कॅम्प लावला आहे, चुशूल येथे दोन्ही सैन्यदलांच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेवेळी दोन्ही देशांचे सैन्य ज्या जागी होते तिथे परत जातील, असा निर्णय ठरला होता. भारतीय सैन्यदलाला मागे येण्याचे निर्देश देण्यात आले. 


मात्र, अधिकाऱ्यांच्या निर्णयानंतरही चीनी सैनिक आपल्या संख्येवर घमंड दाखवत मागे हटण्यास तयार नव्हते. पेट्रोल पॉईंट १४ येथे चीनी सैनिकांशी चर्चा करण्यासाठी जाणाऱ्या कमांडिंग ऑफीसर संतोष बाबू आणि अन्य सैनिकांना चीनी अधिकाऱ्यांना घेरण्यात आले. कारण त्यावेळी हल्ल्याची पूर्वतयारी पूर्ण झाली होती. चीनी सळई, दगड, बेसबॉल क्लब घेऊन धावले. याला भारतीय सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. चीनी सैनिकांकडे काठ्या, दंडूके, रॉड, हॉकी स्टीक, बेसबॉल क्बब, ड्रॅगन पंच, पाईप, दगड, खिळे आदी साहित्य पूर्वीपासूनच तयार होते. लढता लढता सैन्य डोंगराच्या अग्रस्थानानजीक पोहोचले. यामुळे चीन आणि भारताचे सैनिक खाली घसरू लागले. 

चीनने मात्र भारतावर आरोप करत भारतीय सैन्यदल सीमाभागात घुसखोरी करत असल्याचा आणि हल्ला करण्याचा आरोप केला. दोन्ही बाजूंना दगडफेक झाली, झटापटही झाली यात दोन्ही सैन्याचे नुकसान झाले. चीनी सैनिकांनी डोंगरांवरून मोठे दगड फेकण्यास सुरुवात केली. भारतीय सैनिकांनी कुठल्याही हत्याराशिवाय या प्रकाराला तोंड दिले. 

भारतीय सैन्याला कमी समजण्याची चूक चीनी सैनिकांच्या चांगलीच अंगलट आली. या झटापटीत चीनचे एकूण दोन डझनाहून अधिक सैनिक मारल्याचा अहवाल आहे. एकूण ११०हून अधिक सैनिकांना इलाजाची गरज आहे. अनेकांना रुग्णालयात नेण्याची गरज आहे. अनेक भागांमध्ये मृतदेह नेण्यासाठी हेलिकॉप्टर सीमेवर घोंगावत आहेत. 

भारतीय सैन्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनी सैनिकांनी भारतीय जवानांचे शव भारताच्या ताब्यात सोपवले. चीनने त्यांच्या सैनिकांचा अधिकृत आकडा जाहीर केलेला नाही. मात्र, भारतीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकूण ४० सैनिक मारले गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





@@AUTHORINFO_V1@@