धक्कादायक ! १६ वर्षीय खेळाडूच्या आत्महत्येने क्रीडाविश्व हादरले...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2020
Total Views |

cricket_1  H x
नवी दिल्ली : सध्या कोरोनामुळे क्रीडा विश्वाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. गेल्या ३ महिन्यांपासून कुठलेच सामने न झाल्याने अनेक स्थानिक खेळाडूंची उपासमार होत आहे. यामध्ये मंगळवारी त्रिपुराची १६ वर्षीय क्रिकेटपटू अयांती रेंग हिने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आणि संपूर्ण क्रीडाविश्व हळहळले. राहत्या घरीच तिने गळफास लाऊन आत्महत्या केली. अद्यापतरी कुठलीही सुसाईड नोट सापडली नसून पोलिसांचा तपास चालू आहे. अयांती वर्षभरापासून त्रिपुराच्या १९ वर्षांखालील संघाची सदस्य होती. तिच्या आत्महत्येमुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाचा स्थानिक खेळाडूंवर पडलेला परिणाम पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
 
 
 
 
 
 
अयांती रेंगने स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत राज्याच्या २३ वर्षांखालील ट्वेंटी-२० संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तिच्या निधनावर त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनचे सचिन तिमिर चंदा यांनी शोक व्यक्त करत सांगितले की, “राज्याने एक उदयोन्मुख खेळाडू गमावला आहे. तिच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे.” कोरोनाच्या कहरनंतर लॉकडाऊन जारी करण्यात आले. यामुळे देशभरामध्ये सर्व क्रीडा सामने आणि सराव बंद करण्यात आले होते. तिच्या आत्महत्येच्या कारणाचा पोलीसा तपास करत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@