प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेचे मोटरमन, गार्ड सज्ज !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2020
Total Views |

railway_1  H x
मुंबई : पावसाळ्यात प्रवाशांची सुरक्षा कशा प्रकारे करावी, यासाठी मोटरमन व गार्ड यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच एसपीएडी (सिग्नल पासिंग एट डेंजर) आणि प्लॅटफॉर्म ओव्हरशूटिंग टाळण्यासाठी त्यांना तयार केले जात आहे. मध्य रेल्वेने आपल्या मोटरमन आणि गार्ड्सचे ज्ञान अद्ययावत करण्याचे अभूतपूर्व कार्य पूर्ण केले आहे.
 
 
लाखो प्रवाशांना सुरक्षितपणे नेण्याची जबाबदारी पार पाडताना मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरी विभागातील कर्तव्यावरील प्रत्येक मोटरमन दररोज सरासरी ३०० सिग्नलवर लक्ष देत असतो. म्हणूनच, लोकल ट्रेनच्या कामकाजाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशिक्षण आणि ज्ञान अद्ययावत करणे अत्यंत आवश्यक आहे. मुंबई कुर्ला ट्रेनिंग सेंटरमध्ये मोटरमन आणि गार्ड्सना ऑनलाईन प्रशिक्षणद्वारे वेगवेगळ्या नियमाविषयी माहिती दिल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी केल्यामुळे मुंबई उपनगरी सेवा बंद करण्यात आल्या. लॉकडाऊनच्या आधी मोटरमन ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण दिले जात होते. लॉकडाऊन नंतर दिशानिर्देशांनुसार उपनगरीय मोटरमन आणि गार्ड्ससाठी ऑनलाईन प्रशिक्षण करण्यात आले. या लॉकडाउन कालावधीत एकूण २४७ मोटरमनने प्रशिक्षण घेतले आहे.
 
 
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे एका दिवसात सुमारे १,७७४ उपनगरी रेल्वे सेवा चालवल्या जातात. ऑनलाईन प्रशिक्षणात फ्लॅश लाईट, हेड लाइट वापर, डिटोनेटरचा वापर, स्वयंचलित सिग्नलिंग सेक्शन व अबसोल्यूट ब्लॉक विभागाचे ज्ञान यासह सुरक्षिततेच्या तांत्रिक ज्ञानाच्या व्यापक बाबीबद्दल त्यांचे प्रबोधन करण्यात येते. मोटरमनचे हे प्रशिक्षण आवश्यक असते. कारण देशातील इतर रेल्वे विभागात दोन सिग्नलमधील किमान अंतर कमीत कमी एक किलोमीटर आहे, तर मुंबईत ते अर्ध्या किलोमीटरपेक्षा कमी आहे. लॉकडाऊनच्या काळात मध्य रेल्वेने आपल्या मोटरमन आणि गार्ड्सचे ज्ञान अद्ययावत करण्याचे अभूतपूर्व कार्य पूर्ण केले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@