भारतमातेचा सुपूत्र हुतात्मा कर्नल संतोष बाबू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jun-2020
Total Views |
Karnal Karnal_!_1 &n





नवी दिल्ली : लडाखच्या गालवान घाटीत सोमवारी रात्रभर सुरू असलेल्या भारत आणि चीन सैन्यदलात झालेल्या झटापटीत भारताचे कर्नल आणि दोन जवान हुतात्मा झाले. यातील कर्नल संतोष बाबू १६ बिहार रेजिमेंटचे कमांडींग ऑफीसर होते. त्यांच्यासह झारखंडचे कुंदन ओझा आणि हवालदार पलानीही हुतात्मा झाले आहेत. कर्नल संतोष गेल्या १८ महिन्यांपासून लडाखमध्ये भारताच्या सीमेवर तैनात होते. 

सैन्यदलाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लडाखमध्ये पेट्रोलिंग पॉईंट येथे १४ कर्नल संतोष आणि दोन जवानांची चीनी सैन्याशी झटापट झाली. शहीद संतोष बाबू तेलंगणाच्या सुर्यापेट येथे राहणारे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचे वडील शिक्षक आहेत. संतोष हैदराबाद येथे सैनिक स्कूलमध्ये एनडीएचे विद्यार्थी होते. 




Karnal _1  H x




मे महिन्यापासून या भागात तणाव सुरू आहे. जूनमध्ये चार वेळा दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली त्यानंतर पुन्हा हिंसाचार भडकला. भारत-चीन सीमेवर गेल्या ४१ दिवसांपासून तणाव आहे. ५ मेपासून याची सुरुवात झाली. दोन्ही देशांच्या सैन्यदलात झालेल्या चर्चेत हा तणाव कमी करण्याचा प्रयत्न होईल, असे निष्पन्न झाले होते. डी-एक्स्केलेशन अंतर्गत दोन्ही देशांचे सैन्य विवादात्मक सीमारेषेवरील भागातून मागे हटत आहेत, असे ठरवण्यात आले होते.



















@@AUTHORINFO_V1@@