मुंबई : कोरोनाच्या परिस्थितीत राज्यसरकारने अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत वारंवार निर्णय बदलले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याच्या कारणाने भाजपने राज्य सरकारला ठोस निर्णय घेण्याबाबत वारंवार मागणी केली आहे. अशातच भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आता उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांची तुलना थेट रात्रीस खेळ चालेमधील पांडूशी केली आहे.
आशिष शेलार यांनी ट्वीट करून उदय सामंत यांना ATKT च्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत आठवण करून दिली आहे. 'रात्रीस खेळ चाले" मध्ये पांडू “इसरतो” तसे आमचे कोकणचे उच्च शिक्षण मंत्री निर्णयाची "योग्य वेळ" इसरले की काय? नाहीतर म्हणायचे, काय त्या? परीक्षा कित्याक..? अण्णानु “इसरलंय” असा खोचक टोला शेलार यांनी लगावला आहे.तसेच, विद्यार्थीहित आणि ATKT च्या आमच्या विद्यार्थ्यांसाठी हा पाठपुरावा आहे, त्यामुळे लवकरात लवकर याबद्दल निर्णय घ्या, अशी आठवण शेलार यांनी सामंत यांना करून दिली.