मुंबई महापालिकेच्या नालेसफाईत गोलमोल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2020
Total Views |
गोवंडी नाला_1  
 
 
 
 


मुंबई : मुंबईतील नालेसफाईत पालिकेचे गोलमाल असून अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये गाळच गाळ साचलेला आहे. त्यामुळे यंदा मुंबईत पाणी भरण्याचीच शक्यता अधिक आहे. पावसाळ्यापूर्वी मुंबई दरवर्षी ७० टक्के नाले सफाई करते. ते कामही शंभर टक्के पूर्ण होत नाही. मात्र यंदा पालिका प्रशासनापुढे कोरोनाचे संकट असताना आणि एप्रिलच्या अखेरीस नालेसफाईला सुरुवात झाली असताना नालेसफाई ११३ टक्के झाल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र हा दावा खोटा ठरेल असा दाखलाच माजी खासदार भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या समाज माध्यमांवर प्रसारित केला आहे.


 
सोमय्या म्हणतात की, जर कचरा तसाच नाल्यांमधून असेल तर त्या ११३ टक्क्यांचा अर्थ काय घ्यायचा? मुंबई महापालिकेची नालेसफाई केवळ कागदावरच झाली आहे. जर नालेसफाई झाली असेल तर कचरा टाकला कुठे, कधी आणि केव्हा असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. मात्र हे प्रश्न उपस्थित करूनही पालिका प्रशासन त्याचे उत्तर देऊ शकलेले नाही. राज्यात सत्तेत सहभागी असलेले आणि मुंबई महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून असलेल्या काँग्रेस पक्षानेही नालेसफाईबाबत साशंकता व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या मते तीस टक्क्यांपेक्षा अधिक नालेसफाई झाली नसावी, तर प्रशासनातर्फे करण्यात आलेला ११३ टक्क्यांचा दावा फोल ठरावा असाच आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नाले गाळ्याने भरू जाऊन मुंबईत पाणी अधिक भरण्याचीच शक्यता आहे.


 
 
भाजप नेते अॅड. आशीष शेलार यांनी आठ दिवसांपूर्वीच पाहणी केली असता यावर्षी नालेसफाईची ४० टक्केच झाल्याचे त्यांनी म्हटले होते. उद्दिष्टाएवढी नालेसफाई झालेली नसल्यामुळे मुंबई महापालिका डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात आलेल्या गाळाची आकडेवारी जाहीर करीत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. लफवा छपवी नको, डंपिंगवर किती गाळ टाकला ते घोषित करा, अशी मागणी करत अॅड. आशिष शेलार यांनी नालेसफाईच्या कामांची पोलखोल केली होती. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी गाळाने भरलेल्या गोवंडी येथील नाल्याचे फोटो प्रसारित करून शेलार यांच्या शंकेवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे नालेसफाईत प्रशासनाने गोलमोल केल्याचे सिद्ध होत आहे.


 
 
शेलार यांनी पाहणी केलेल्या नाल्यांपैकी काही ठिकाणचा गाळ नाल्यातच आहे. तर काही ठिकाणी नाल्याच्या बाजूला गाळ पडून होता. गाळ उचलेला नव्हता. त्यामुळे महापालिकेने गेल्यावर्षी आणि यावर्षीचे नाल्याच्या गाळाच्या वजनाची आकडेवारी घोषित करावी. यावर्षी डंपिंगवर किती गाळ टाकला ते घोषित करावे, असे आव्हान देतानाच लपवाछपवी करुन मुंबईकरांचा जीव धोक्यात घालू नका, असे आमदार अँड आशिष शेलार म्हणाले होते. आशीष शेलार यांच्या म्हणण्याला किरिट सोमय्या यांनी दुजोराच दिल्याचे दिसत आहे. त्यांनी गाळाने भरलेल्या नाल्याचे फोटोच प्रसार माध्यमांवर प्रसारित केले आहेत. त्यामुळे नालेसफाईत पालिकेने गोलमाल केल्याचे सिद्ध होत आहे.





 
 
@@AUTHORINFO_V1@@