कोरोनाने मेलो असतो तर बरं झालं असतं! रुग्णाला दिले आठ कोटींचे बिल!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2020
Total Views |
corona _1  H x

वॉशिंग्टन : कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना लाखोंची बिले पाठवून पैसे उकळणाऱ्या रुग्णालयांची उदाहरणे आपण गेल्या काही दिवसांपासून पाहिली मात्र, कोरोना रुग्णाला तब्बल आठ कोटींहून जास्त रक्कमेचे बिल पाठवल्याने एका ७० वर्षीय वृद्धाला मी जगलोच का, असा प्रश्न पडला आहे. हा रुग्ण कोरोनाशी ६२ दिवस झुंज देत होता. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला घरी पाठवताना आकारलेले बिल पाहून तो चक्रावून गेला आहे. द सिएटल टाईम्स या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील सिएटल शहरात हा प्रकार घडला आहे.

 
कोरोनामुळे अमेरिकेत मृतांमध्ये वृद्धांचा सामावेश जास्त आहे. अशातच या रुग्णाने कोरोनावर केलेली मात म्हणजे चमत्कार मानला जात आहे. दरम्यान, ४ मार्च रोजी त्यांची प्रकृती इतकी खालावली की, नर्सने नातेवाईकांना बोलावण्याची तयारी केली होती. मात्र, त्यानंतर सलग ६२ दिवस ते कोरोनाशी झुंज देत होते. त्यांच्या प्रकृतितील सुधारणेला वैद्यकीय व्यवस्थेने चमत्कार मानला आहे.


स्वीडिश मेडिकल सेंटरमध्ये त्यांना भर्ती करण्यात आले होते. त्यांना घरी पाठवत असताना एकूण १८१ पानांचे बिल त्यांना सोपवण्यात आले. त्यात प्रत्येक दिवसाचा आयसीयूचा खर्च ७.३९ लाख इतका लावण्यात आला आहे. ४२ दिवस स्टेराईल रुममध्ये ठेवण्यासाठी ३.१० कोटी रुपये आकारण्यात आले होते. २९ दिवस व्हेंटीलेटरवर ठेवण्यासाठी ६२.२८ लाख रुपये आकारण्यात आले होते. दोनवेळा जीव जातो की काय, अशी अवस्था असतानाही डॉक्टरांनी आपली सर्वशक्ती पणाला लावली होती. त्यांच्यावर यानंतर एकूण ७६ लाख रुपयांचा खर्च आकारण्यात आला आहे.

 
दरम्यान, जमेची बाजू म्हणजे यातला एकही रुपया रुग्णाला द्यावा लागणारा नाही. तिथल्या यंत्रणेनुसार वृद्धांचा सर्व खर्च हा विम्याच्या रक्कमेतून सरकार भरणार आहे. रुग्णाला दाखल करण्यात आलेल्या रुग्णालयाचा मजला हा वृद्धांसाठी राखीव होता. त्यामुळे इलाजाचा खर्च रुग्णाला भरावा लागणार नाही. मात्र, रुग्णाने आपल्यावर एवढा झालेला खर्च पाहून चिंता व्यक्त केली आहे. करदात्यांचा पैसा अशाप्रकारे माझ्या आयुष्यासाठी खर्च झाला म्हणून मी चिंतेत आहे, मी वाचलोच नसतो तर इतका पैसा खर्च झाला नसता, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.


 
कोरोना काळातच्या संकटसमयी अमेरिकेतील रुग्णालयांना १० कोटी डॉलर्सची मदत सरकारने केली आहे. अमेरिकेत कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे. एकूण मृतांचा आकडा हा १ लाख १७ हजार ५३३ वर पोहोचला आहे. संक्रमितांचा आकडा २१ लाख ४२ हजार ४५३ वर पोहोचला आहे. संपूर्ण जगभरात कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या ४ लाख ३२ हजार ८९८ इतकी झाली असून एकूण कोरोनाबाधित ७८ लाख ९६ हजार २८१ इतके आहेत.




@@AUTHORINFO_V1@@