पाणी साचणाऱ्या वस्तू हटविण्याची पालिकेची मोहीम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2020
Total Views |
BMC_1  H x W: 0

चमचाभर पाण्यातही होतेय शेकडो डासांची उत्पत्ती


मुंबई : पावसाळी आजारांच्या पार्श्वभूमीवर साचलेल्या चमचाभर पाण्यातही शेकडो डासांची उत्पत्ती होते आणि हे पाणीच डेंग्यू, मलेरियाला कारणीभूत ठरते. त्यामुळे पाणी साठवून ठेणाऱ्या वस्तू हटविण्याची मोहीम पालिकेने सुरू केली आहे.


पावसाळा हंगाम विविध आजारांसाठी आमंत्रण देणारा ठरतो. बाटलीचं झाकण, टायर, थर्माकोल, नारळाच्या करवंट्या, वातानुकुलन यंत्रणा, रेफ्रिजरेटरचा डिफ्रॉस्ट ट्रे, रिकामी शहाळी, रोप कुंड्यांखालील ताटल्या यासारख्या विविध वस्तूंमध्ये साचलेल्या पाण्याचे काही थेंबही डेंग्यू, मलेरियाच्या डासांच्या उत्पत्तीसाठी रोगप्रसारासाठी कारणीभूत ठरतात. महापालिकेच्या कीटकनाशक विभागातर्फे १ जानेवारीपासून पाणी साचणाऱ्या तब्बल १ लाख ८ हजार २६ एवढ्या छोट्या - मोठ्या वस्तू आणि ५१४ टायर्स हटविण्यात आले आहेत. या अनुषंगाने नागरिकांनी देखील डास प्रतिबंधाबाबत आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी आणि महापालिकेद्वारे वेळोवेळी दिल्या जाणा-या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापालिकेचे कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी केले आहे.


१ जानेवारी पासून आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे १६ हजार ३५५ वस्तू महापालिकेच्या 'ई' विभागातून हटविण्यात आल्या आहेत. तर त्या खालोखाल ९ हजार ३५८ वस्तू 'जी दक्षिण' विभागातून, ८ हजार ३२ वस्तू या 'ए' विभागातून हटविण्यात आल्या आहेत. याच पद्धतीने महापालिकेच्या सर्व २४ विभागातून १ लाख ८ हजार २६ इतर वस्तू हटविण्यात आल्या आहेत.


अनेक ठिकाच्या परिसरातून गेल्या साडेपाच महिन्यात पाणी साचतील असे टाकाऊ टायर्स व इतर वस्तू हटविण्यात आल्या. या कार्यवाही दरम्यान महापालिकेच्या 'एफ दक्षिण' विभागात सर्वाधिक म्हणजे १२३ टायर्स हटविण्यात आले आहेत. तर त्या खालोखाल 'एन' विभागातून ९९ व 'एफ उत्तर विभागातून ७१ टायर्स हटविण्यात आले आहेत. तर सर्व २४ विभागातून ५१४ टायर्स हटविण्यात आले आहेत, अशीही माहिती श्री. नारिंग्रेकर यांनी दिली आहे.


डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांची उत्पत्ती साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच होते. महापालिकेच्या सर्वेक्षणादरम्यान घरात व घराशेजारील परिसरात साचलेल्या चमचाभर पाण्यातही डेंगी व मलेरियाचा प्रसार करणा-या डासांची उत्पत्ती स्थाने आढळून येतात. नागरिकांनी आपल्या घराच्या व कार्यालयाच्या परिसरातील पाणी साचू शकतील, अशी ठिकाणे तात्काळ नष्ट करावीत, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

साचलेले पाणी का नष्ट करावे?

* साचलेल्या पाण्यात डासांची मादी एकावेळी सुमारे १०० ते १५० अंडी घालते.
* आठवडाभरात त्यातून डासांची निर्मिती होते.


या उपाययोजना करा
* दर आठवड्यात किमान एकदा तरी आपल्या घरातील पाणी साठविण्याच्या भांडी रिकामी करा.
* सोसायटीचा परिसर, सोसायटीतील बंद घरे, लिफ्टचे डक्ट, इमारतीची गच्ची इत्यादी विविध ठिकाणांची आठवड्यातून एकदा नियमितपणे तपासणी करून पाणी साचणारी ठिकाने नष्ट करा.
* पाणी साठविणारी भांडी रिकामी करून आठवड्यातून एक दिवस 'कोरडा दिवस' म्हणून पाळावा.



@@AUTHORINFO_V1@@