कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी ‘वॉर्ड वॉर रूम’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2020
Total Views |
ward war room_1 &nbs


रुग्णालयात उपलब्ध खाटांची तातडीने माहिती मिळणार

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांची होणारी परवड थांबविण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता विभागस्तरावर `वॉर रूम` कार्यान्वित केले आहेत. या `वॉर्ड वॉर रूम`मुळे रुग्णांना तातडीने खाटा उपलब्ध होण्यासाठी येणारी अडचण दूर होणार आहे.


कोरोनाबाधितांना रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या खाटा मिळवून देण्यासाठी १९१६ या क्रमांकावर चौकशी करण्याची सुविधा होती. मात्र या क्रमांकावर नागरी मदत सेवेचे फोन येत असल्याने कोरोनाच्या रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत असे. मात्र, आता विकेंद्रित पद्धतीने २४ विभाग कार्यालयांच्या स्तरावरून रुग्णांसाठी ताबडतोब खाटा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन कार्यप्रणाली सुरु करण्यात आली आहे. यातून कोविड बाधित रुग्णांना विभाग स्तरावरुनच अधिक जलद, सुलभ व प्रभावीपणे आरोग्य सेवा देण्यास मदत होणार आहे.

विभागीय नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक :
ए : २२७० ०००७
बी : २३७५ ९०२३
सी : २२१९ ७३३१
डी : २३८३५००४
ई : २३०० ०१५०
एफ/दक्षिण : २४१७ ७५०७
एफ/उत्तर : २४०११३८०
जी/दक्षिण : २४२१ ९५१५
जी/उत्तर : २४२१ ०४४१
एच/पूर्व : २६६३ ५४००
एच/पश्चिम : २६४४ ०१२१
के/पूर्व : २६८४ ७०००
के/पश्चिम : २६२० ८३८८
पी/दक्षिण : २८७८ ०००८
पी/उत्तर : २८४४ ०००१
आर/दक्षिण : २८०५ ४७८८
आर/उत्तर : २८९४ ७३५०
आर/मध्य : २८९४ ७३६०
एल : २६५० ९९०१
एम/पूर्व : २५५२ ६३०१
एम/पश्चिम : २५२८ ४०००
एन : २१०१ ०२०१
एस विभाग : २५९५ ४०००
टी विभाग : २५६९ ४०००



प्रत्येक ‘वॉर्ड वॉर रूम’मध्ये दिल्या जाणाऱ्या दूरध्वनी क्रमांकाच्या ३० वाहिन्या असतील. २४x७ तत्वावर तीन सत्रांमध्ये अखंडपणे कार्यरत राहणाऱ्या या कक्षामध्ये वैद्यकीय अधिकारी, आवश्यक इतर कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


विभाग कार्यालयांना कोरोना रुग्णसेवेसाठी दिलेल्या रुग्णवाहिकांच्या सेवेचे व्यवस्थापनही आता विभागीय कक्षाद्वारे होणार असल्याने रुग्णवाहिका सेवेची प्रभावी अंमलबजावणी होईल असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.


@@AUTHORINFO_V1@@