घरात नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा ! इम्रान खान यांची भारताला अजब ऑफर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jun-2020
Total Views |
 
pakistan_1  H x




इस्लामाबाद
: कोरोना विषाणूच्या या आपत्तीत भ्रष्टाचार आणि नागरिकांकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपावरून स्वत:च्या घरामध्ये वाईटरीतीने घेरलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला मदतीची ऑफर दिली आहे. इम्रान खान यांनी एका अहवालाचा हवाला देत दावा केला आहे की भारतातील ३४ टक्के कुटुंबे मदतीशिवाय आठवड्यापेक्षा जास्त काळ जगू शकत नाही.



इम्रान खान यांनी एका बातमीचा हवाला देत ट्वीट करत म्हटले आहे की, "या अहवालानुसार भारतातील ३४ टक्के कुटुंबे एका आठवड्यापेक्षा जास्त काळ मदतीशिवाय जगू शकत नाहीत. मी भारताची मदत आणि रोख रक्कम हस्तांतरण कार्यक्रमांतर्गत मदत करण्यास आम्ही तयार आहोत. आमच्या या पुढाकाराबद्दल या रोख हस्तांतरण कार्यक्रमाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले आहे." इम्रान खान पुढे म्हणाले, 'आमच्या सरकारने अत्यंत पारदर्शक पद्धतीने एक कोटी कुटुंबांना नऊ आठवड्यांत १२० अब्ज रुपये यशस्वीरित्या हस्तांतरित केले आहेत. जेणेकरुन गरीब कुटुंबांना कोरोनाच्या या कठीण प्रसंगी मदत होईल.' खरं तर, इम्रान खानने एका अहवालाचा हवाला देत म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या काळात लॉकडाउनचा भारतात गंभीर परिणाम झाला आहे.


भारताने दिले चोख प्रत्युत्तर 



यासंदर्भात भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत म्हंटले हे की, "पाकिस्तानने हे लक्षात घेण्याची गरज आहे. त्यांच्या अर्थव्यवस्थेवरील कर्ज हे त्यांच्या जीडीपीच्या ९०% आहे आणि आमचे प्रोत्साहन पॅकेज हे पाकिस्तानच्या जीडीपीइतके मोठे आहे."



पाकिस्तानमध्ये कोरोनाचा उद्रेक , परिस्थिती हाताबाहेर


वास्तविक, या मदतीच्या ऑफरद्वारे इम्रानने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. काही दिवसांपूर्वीच इमरान म्हणाले की, लॉकडाऊनमुळे लोक भारतात भुकेले आहेत. त्याच वेळी, अमेरिकेसारख्या समृद्ध देशात लाइनमध्ये उभे असलेल्या लोकांना अन्न दिले जात आहे. पाकिस्तानने जेवढे नुकसान केले ते मात्र त्यांनी केले नाही असा दावा त्यांनी केला. इम्रान खान यांनी पाकिस्तानमधील लॉकडाऊनचा दुसरा टप्पा नाकारला आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानला दुसरा लॉकडाउन फायदेशीर नाही. लॉकडाऊनमुळे देशाला ८०० कोटी पाकिस्तानी रुपयांचे नुकसान झाले आहे.



कोरोनाच्या प्रकोपामुळे पाकिस्तानमधील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, अशा वेळी इम्रान खान भारताला मदत देण्याच्या बाथा मारत आहे. डॉक्टरांना पीपीई किट मिळत नाही आणि स्वत: दिग्गज मंत्री आणि स्वत: इम्रान सरकारचे नेते कोरोना विषाणूच्या चक्रात अडकले आहेत. पाकिस्तानमधील मुस्लिम लीग-नवाज या विरोधी पक्षाचा प्रमुख शाहबाज शरीफ यांनाही कोरोना विषाणूची लागण झाली आहे. देशातील कोरोना विषाणू-संक्रमित रुग्णांची संख्या ११९,५३६पर्यंत वाढली आहे. त्याच वेळी २,३५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इम्रान जगभरातून कर्ज मागत आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या साथीच्या आव्हानाची पूर्ती करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीबी) पाकिस्तानला ५००दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कर्ज जाहीर केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@