विनोदी अभिनेते जगेश मुकाटी यांचे निधन!

    11-Jun-2020
Total Views |

jagesh mukati_1 &nbs


श्वसनाचा त्रास झाल्याने चार दिवसांपासून होते रुग्णालयात दाखल


मुंबई : ‘अमिता का अमित’, ‘श्रीगणेश’ यांसारख्या मालिका व ‘हंसी तो फसी’, ‘मन’ या चित्रपटांत भूमिका साकारणारे अभिनेते जगेश मुकाटी यांचे निधन झाले. १० जून रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ४७ वर्षांचे होते. त्यांना दीर्घ काळापासून अस्थमाचा आजारा होता. ते गेल्या चार दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. बुधवारी त्यांना श्वास घेताना खूप त्रास जाणवला. अखेर दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.


गेल्या काही वर्षांत जगेश यांचे वजन सातत्याने वाढत होते. त्यांचे वजन १५० किलो झाले होते. जगेश यांना चार दिवसांपूर्वी श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला होता, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारदरम्यान त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अचानक आलेल्या अस्थमाच्या अटॅकमुळे त्यांची प्राणज्योत मालवली.


गुजराती रंगभूमीवर त्यांनी स्वतःची वेगळी ओखळ निर्माण केली होती आणि अनेक टीव्ही मालिका आणि हिंदी-गुजराती चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. त्यांनी 'अमिता का अमित', 'कसम से' या मालिकांमध्ये काम केले होते. मात्र त्यांना धीरज कुमार यांची निर्मिती असलेल्या 'श्रीगणेश' या मालिकेतील गणेशाच्या मुख्य भूमिकेतून लोकप्रियता मिळाली होती. अनेक जाहिरातींमध्येही ते दिसले. अलीकडेच ते 'चाल जीवी लईए' या गुजराती चित्रपटात झळकले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.