'अल कायदा'च्या निशाण्यावर हिंदूत्ववादी नेते?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2020
Total Views |
 Al qaeda  _1  


नवी दिल्ली : दहशतवादी संघटना अल कायदा लोन वुल्फ अटॅकद्वारे भारतात मोठी उलथापालथ माजवण्याच्या तयारीत आहे. सरकारमधील मोठी मंत्री, ऑफीसर आणि हिंदूत्ववादी नेते सुरक्षा यंत्रणांशी संलग्न व्यक्ती अल कायदाच्या निशाणावर आहेत. अलकायदाने बांग्लादेशात कट्टर इस्लामिक विद्यार्थ्याना ऑनलाईन ट्रेनिंग कंटेंट तयार करण्याची जबाबदारी सोपवली आहे. 
 
बुधवारी याबद्दल एका अहवालातून हा खुलासा झाला आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन ट्रेनिंग कंटेंटद्वारे जिहादींनी तरुणांना लोन वुल्फ अटॅकसाठी प्रशिक्षण देण्याची तयारी सुरू केली आहे, या संदर्भातील व्हीडिओ विविध सोशल मीडिया आणि वेबसाईटद्वारे पोस्ट करण्यात आले होते. अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेविषयी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे, असे मत गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केले आहे. यांच्या सुरक्षेसाठी सदैव सतर्क राहणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. अशा व्यक्तींना भेटण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी केली पाहीजे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच सुरक्षा यंत्रणांनी कुठल्याही प्रकारचे भीतीदायक वातावरण तयार करू नये, असेही सांगण्यात आले आहे. 
 
 
कश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून भारतीय सैनिक कंठस्नान घालत आहेत. याच कारणास्तव अल-कायदा संघटना अस्वस्थ झाली असल्याचे म्हटले जात आहे. देशात दहशत पसरवण्यासाठी लोन वुल्फ अटॅकचा सहारा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आत्तापर्यंत या वर्षात विविध चकमकींमध्ये शंभरहून अधिक दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात भारतीय सैन्यदलाला यश आले आहे. त्यापैकी आठ जण हे या संघटनांचे टॉप कमांडर होते. 
 
 

कसा होतो लोन वुल्फ अटॅक
हा हल्ला करणाऱ्याच्या डोक्यात संपूर्णपणे कट्टरपंथी विचार बिंबवले जातात.
जितके काम सांगितले जाईल तेवढेच करण्याचे आदेश त्यांना आहेत.
यामध्ये एकटा दहशतवादी संपूर्ण उलथापालथ घडवू शकतो.
या हल्ल्यात जास्तीत जास्त हत्यारे वापरली जातात. लक्ष्यापर्यंत पोहोचत असताना
जास्तीत जास्त नुकसान करण्याचे आदेश दिलेले असतात.

@@AUTHORINFO_V1@@