एकता कपूर विरोधात हिंदुस्थानी भाऊने दाखल केली तक्रार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jun-2020
Total Views |

ekta kapoor_1  



वेबसिरीजमधून सैनिकांचा अपमान केल्याचा आरोप लावत दाखल केला एफआयआर


मुंबई : बिग बॉस १३ आणि युट्युब व्हिडीओच्या माध्यमातून घराघरात पोहचलेल्या हिंदुस्थानी भाऊची म्हणजेच विकास पाठक यांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. मध्यंतरी कॅरीमिनाटी विरुद्ध आमिर सिद्दीकी म्हणजेच युट्युब विरुद्ध टिकटॉक असा वाद सुरु असताना विकास यांचा व्हिडीओ बराच चर्चेत होता. आता पुन्हा एकदा हिंदुस्थानी भाऊंचे नाव एका वेगळ्या गोष्टीमुळे समोर आले आहे.


प्रसिद्ध निर्माती एकता कपूर आणि शोभा कपूर यांच्याविरोधात हिंदुस्थानी भाऊने एफआयआर दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून हिंदुस्थानी भाऊ सोशल मीडियावर चर्चेत आहे. काल त्यांनी एक पोस्ट शेअर करत 'उद्या मोठा धमाका होणार आहे', असे म्हटले होते. एकता कपूरने तिच्या वेबसिरीज मधून भारतीय सैन्याचा अपमान केला गेल्याचा आरोप लावत विकास यांनी खार पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलीस स्टेशन मध्ये जाण्याआधी विकास यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून आपण एका सेलिब्रिटींच्या विरुद्ध टाकणार करण्यासाठी जात आहोत, असे सांगितले होते.


एकता आणि शोभा कपूर यांच्या निर्मिती असलेल्या एका वेबसीरिजमध्ये सैनिकाचा अपमान करण्यात आला असल्याचे या एफआयआरमध्ये म्हटले गेले आहे. या वेबसिरीजच्या एका आक्षेपार्ह दृश्यात सैनिकी गणवेशाचा वापर करण्यात आल्याने हा सैन्याचा अपमान आहे, असे म्हणत हिंदुस्थानी भाऊने एकता विरोधात तक्रार दाखल केली आहे.



@@AUTHORINFO_V1@@