छत्तीसगडमधील चकमकीत चार नक्षलवादी ठार ; एक पोलीस हुतात्मा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2020
Total Views |

naxals_1  H x W
रायपूर : एकीकडे कोरोनाशी युद्ध चालू असताना दुसरीकडे पोलिसांना नक्षलवाद्यांशीदेखील दोन हात करावे लागत आहेत. छत्तीसगडमधील राजनांदनाव जिल्ह्यामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक पोलीस उपनिरीक्षक हुतात्मा झाले. तर यावेळी चार नक्षलींचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक गोरखनाथ बघेल यांनी ही माहिती दिली. यावेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला.
 
 
शुक्रवारी रात्री उशिरा मदनवाडा येथील परधोनी गावाजवळ ही चकमक झाली. चकमकीची माहिती मिळताच जिल्हा पोलीस मुख्यालयातून मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा मागविण्यात आला. मात्र, रात्रीची वेळ असल्याने पोलिसांना घटनास्थळी पोहचण्यास अडथळे आले. मोठा शस्त्रसाठा जप्तपोलिसांनी नक्षलवाद्यांकडील एके-४७ रायफल, १ एसएलआर, ३१५ बोअर रायफर जप्त केल्या आहेत. घटनास्थळावर पोलिसांना चार नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@