नाशिककरांनो वेळीच सावध व्हा !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-May-2020
Total Views |

Nashik Hospital _1 &
 
नाशिक : कोरोनाचा धोका वाढू लागला असून नागरिकांनी आणखी दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे शुक्रवारी सकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये मालेगावात २१, नाशिक शहरात १३ तर विंचूरमध्ये २, दिंडोरीत एक तर परजिल्हयातील एक असे नवीन ३८ कोरोनाचे रुग्ण निष्पन्न झाले आहेत.
 
 
 
३८ कोरोना रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रेसतांचा आकडा ५५९ झाला आहे. शुक्रवारी आढळून आलेल्यामध्ये २१ रुग्ण मालेगावातील आहेत. तर नाशिक शहरातही १३ रुग्ण वाढले आहेत. यात सातपूरमध्ये ८, सिडकोत २, पंचवटीतील हिरावाडीत १, श्रीकृष्ण नगरमध्ये १ आणि पाथर्डी फाटा तेथे १ रुग्ण आहे तर सोलापूरचा एक आहे. उर्वरित जिल्यात विंचूरमध्ये २ आणि दिंडोरी तालुक्यातील इंदोरेतील १ रुग्ण, असे ३८ रुग्णाची भर पडली आहे. नाशिक शहरात कोरोनाचा धोका वाढला असुन आता तर या विषाणूने दिंडोरी तालुक्यातही शिरकाव केला आहे. यापूर्वी कोरोनाचे निफाड, सिन्नर, नांदगाव (मनमाड), चांदवड, सटाणा, दाभाडी (मालेगाव ग्रामीण) मध्ये शिरकाव केलेला आहे.
 
 
 
 
दिलासादायक म्हणजे...
 
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून ही चिंताजनक बाब आहे पण दुसरीकडे दिलासादायक बाबही घडली आहे. ४२० प्रलंबित अहवालापैकी तब्बल ३८० अहवाल निगेटिव्ह आले असल्याने तुर्तास तरी दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी ३८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे आकडा ५५९ चा आकडा गाठला आहे. याचबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भाग आणि शहरात कोरोनाने आता शिरकाव केला आहे. कोरोनाचा फैलाव बघून कोरोनाचा धोका वाढतोय असेच चिन्ह दिसत आहे.
@@AUTHORINFO_V1@@